महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Pav bhaji : मुंबईची पाव भाजी जगभरात प्रसिद्ध, पाहा रेसिपी - How To Make Pav bhaji

शहरी भागात पाव भाजी हा एक लोकप्रिय नाश्ता ( Pav Bhaji popular breakfast ) आहे. विशेषतः महाराष्ट्रात, तो खूप आवडीने खाल्ला जातो. पाव भाजी हा जरी नाश्त्याचा प्रकार असला तरी काही जण जेवण म्हणून तो खातात. अनेक पौष्टीक भाज्यांचे मिश्रण करून ते बनवली जाते.

Pav bhaji
पाव भाजी

By

Published : Oct 21, 2022, 12:38 PM IST

मुंबई :शहरी भागात पाव भाजी हा एक लोकप्रिय नाश्ता ( Pav Bhaji popular breakfast ) आहे. विशेषतः महाराष्ट्रात, तो खूप आवडीने खाल्ला जातो. पाव भाजी हा जरी नाश्त्याचा प्रकार असला तरी काही जण जेवण म्हणून तो खातात. अनेक पौष्टीक भाज्यांचे मिश्रण करून ते बनवली जाते. पाव भाजी हा असा एक पदार्थ आहे. जो सर्व वयोगटातील लोकांना आवडतो. पाव भाजीमध्ये भरपूर जिनवसत्त्वे असलेल्या, पोषक घटक असलेल्या भाज्या घालतात. जाणून घेऊयात पाव भाजी रेसिपी. पाव भाजी कशी बनवतात ( How To Make Pav bhaji ) ते पाहू.

पाव भाजी साहित्य :पावभाजी हा मुंबईचा एक प्रसिद्ध स्ट्रीट फूड पदार्थ आहे. पावभाजी हे आरोग्यदायी भाज्यांचे मिश्रण आहे. पाव भाजीमध्ये जर तुम्हाला कोणतीही भाजी आवडत नसेल तर तुम्ही त्याऐवजी तुमच्या आवडीची भाजीही घालू शकता. बटाटे, टोमॅटो, मटार फ्लॉवर, शिमला मिरची यांसारख्या भाज्या मॅश करून आणि पाव भाजी मसाला, गरम मसाला, जिरे पावडर असे मसाले पाव भाजीत वापरले जातात. लिंबाचा रस घालून तयार केलेली भजी बटर पावसोबत सर्व्ह केली ( Pav bhaji ingredient ) जाते.

पाव भाजी पाककृती : पाव भाजी हा तोंडाला पाणी आणणारा पदार्थ आहे. जो अगदी लहान मुलेही आवडीने खातात. सुरूवातीला सर्वभाज्या धुवून भाज्या चिरून घ्या. कुकरमध्ये त्याच्या तीन शिट्या करून घ्या. त्यानंतर त्या मॅश करा. आणिगरम पॅनमध्ये बटर, तेल टाका, त्यात लसून आले टाका. कांदा टॉमेटॉची प्यूरी टाकून चांगले फ्राय करा. त्यात सर्व मसाले घाला. त्यानंतर शिजलेली भाजी अॅड करून त्याला चांगली उकळी आली की पाव भाजी ( Pav bhaji recipe ) तयार.

पाव भाजी कशी सर्व्ह करावी : तुम्ही दुपारचे जेवण किंवा रात्रीच्या जेवणासाठी पाव भाजी कधीही खाऊ शकता. पावभाजी चिरलेली टोमॅटो आणि कांदे बरोबर सर्व्ह करा. तसेच पाव बटर लावून गरम करायला विसरू नका

ABOUT THE AUTHOR

...view details