महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पाकिस्तानी हॅकर्सना भारतीय हॅकर्सचे प्रत्युत्तर, पाकिस्तानी साइटवर भारतीय राष्ट्रगीत - amitabh bachchans twitter account hack

पाकिस्तानी हॅकर्सने सोमवारी रात्री अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक करून त्यावर पाकिस्तानी पंतप्रधानांचा फोटो टाकला. त्याला प्रत्युत्तर देत मंगळवारी भारतीय हॅकर्सनी पाकिस्तानच्या सहा एज्युकेशनल वेबसाईट हॅक केल्या. या वेबसाइट ओपन केल्यावर त्यामध्ये भारताचे राष्ट्रगीत वाजत होते.

पाकिस्तानी हॅकर्सना भारतीय हॅकर्सचे सडेतोड उत्तर

By

Published : Jun 11, 2019, 10:01 PM IST

मुंबई - महानायक अमिताभ बच्चन यांचे सोमवारी रात्री ट्विटर अकाउंट हॅक करण्यात आले. या अकाउंटवर पाकिस्तानी पंतप्रधानांचा फोटो टाकण्यात आला होता. तसेच त्यांच्या अकाउंटवर पाकिस्तानवर प्रेम आहे, असा संदेश देखील लिहिण्यात आला होता. याची सर्वत्र चर्चा होती.

पाकिस्तानी हॅकर्सनी अमिताभ बच्चन यांचे ट्विटर अकाउंट हॅक केले


याला सडेतोड उत्तर म्हणून भारतीय हॅकर्सने मंगळवारी पाकिस्तानच्या तब्बल सहा वेबसाईट हॅक केल्या. या वेबसाइट ओपन केल्यावर भारताचे राष्ट्रगीत वाजत होते. त्यामुळे हा झालेल्या हॅकिंगचा प्रकार पाकिस्तानला सहा तास सोडवता सुटेना असा झाला होता.


भारतीय हॅकर्सने पाकिस्तानच्या एज्युकेशनल वेबसाईट हॅक केल्या. पाकिस्तानच्या ह्या वेबसाईट ओपन केल्यानंतर त्यामध्ये भारतीय झेंडा व गीत दिसत होते. पाकिस्तानी हॅकर्सनी सोमवारी अभिनेते अमिताभ बच्चन यांचे अकाऊंट हॅक केले होते. यातच मंगळवारी भारतीय हॅकर्सनी त्यांच्या वेबसाईट हॅक करून पाकिस्तानला सडेतोड उत्तर दिले. एकंदरीत हे एक सर्जिकल स्ट्राईक म्हणून सर्वत्र या प्रकारची चर्चा आहे.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details