मुंबई- लॉकडाऊनच्या काळात १२ ऑक्टोबर २०२० रोजी मुंबईत अचानक वीज गेली होती. त्यामुळे अनेकांची गैरसोय झाली होती. दक्षिण मुंबईसारख्या विभागात वीज गेल्याने अनेक महत्त्वाच्या कार्यालयांच्या कामांत अडचण निर्माण झाली होती. तसेच रुग्णालयातील महत्वाची कामे रखडली होती. मात्र, ही वीज काही तांत्रिक अडचणीमुळे गेली नसून, चीनने सायबर हल्ला केल्याची माहिती आता समोर येत आहे. हा हल्ला करण्यामागे नेमके काय कारण होते? याचा उलगडा गृहमंत्री अनिल देशमुख लवकरच करणार असल्याची माहिती उर्जामंत्री नितिन राऊत यांनी दिली.
घातपाताची शक्यता
वीज वितरित करणार्या कंपनीच्या ग्रीडमध्ये काही समस्या निर्माण झाल्याकारणाने वीज गेले असल्याचे स्पष्टीकरण त्यावेळी वीजमंडळ तसेच वीजवितरण कंपनीकडून देण्यात आले होते. मात्र, त्या वेळेसही राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी वीज जाण्यामागे काही मोठा घातपात करण्यासंदर्भाची शंका उपस्थित केली होती.
दशकातील सर्वात मोठा वीज पुरवठा खंडीत