महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबईत केंद्रसरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता स्पर्धेचे आयोजन - Central Government's Sanitation Campaign

मुंबई महापालिकेने केंद्रसरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत स्वच्छता स्पर्धेचे आयोजन केले आहे. स्वच्छतेत नंबर वन मिळवलेल्या स्पर्धकाला पालिका प्रशासनाकडून ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे.

Central Government's Sanitation Campaign
मुंबई महापालिकेकडून स्वच्छता स्पर्धेचे आयोजन

By

Published : Nov 17, 2020, 3:23 PM IST

मुंबई - केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत मुंबई महापालिकेने स्वच्छता स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सोसायटी, शाळा, हाॅटेल व रुग्णालय सहभागी होऊ शकणार असून स्वच्छतेत नंबर वन मिळवलेल्या स्पर्धकाला पालिका प्रशासनाकडून ५० हजार रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. नगरसेवक, खाजगी संस्था यांनाही स्पर्धेत सहभागी करत प्रोत्साहन म्हणून बक्षीस देण्याचे जाहीर केले आहे.

या ठिकाणी करा अर्ज -

केंद्र सरकारच्या स्वच्छता अभियानांतर्गत मुंबईत स्वच्छता स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेत सोसायटी, खासगी संस्था, रुग्णालय, हाॅटेल व शाळांसह पथनाट्य करणाऱ्यांना १० हजार रुपये बक्षीस देण्यात येणार आहे. २०२१ च्या स्पर्धेत मुंबई महापालिका सहभागी झाली आहे. केंद्र सरकारच्या गृह व ग्रामीण विभागामार्फत केलेल्या नियमानुसार विजेत्यांची निवड केली जाणार आहे. या अनुषंगाने मुंबई महापालिका हद्दीतील सोसायटी, रुग्णालये, शाळा, हाॅटेल व शौचालये, खाजगी संस्था आदींचे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. युनायटेड वे मुंबई या संस्थेला सर्वेक्षणाची जबाबदारी दिल्याचे अधिकाऱ्याने सांगितले. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी www.unitedwaymumbai.org/mcgmsurvekshan या लिंकवर २७ नोव्हेंबरपर्यंत अर्ज करणे गरजेचे आहे.

मुंबई नेहमीच बाद -

केंद्र सरकारकडून दरवर्षी स्वच्छता सर्वेक्षण केले जाते. या सर्वेक्षणात जागतिक दर्जाचे शहर असलेली मुंबई नेहमीच बाद ठरली आहे. या सर्वेक्षणात मुंबईचा समावेश व्हावा यासाठी पालिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. याचाच एक भाग म्हणून मुंबईतील गृहनिर्माण संकुल, रुग्णालये, हॉटेल्स, शाळा आणि स्वच्छतागृहांसाठी महापालिकेने स्वच्छतेची स्पर्धा आयोजित केली आहे. स्वच्छ सोसायट्या, आस्थापनांची निवड करण्यासाठी खासगी संस्थेची नियुक्ती केली आहे. यास्पर्धेत सर्वोत्तम ठरणार्‍या सोसायट्या, रुग्णालये यांना दीड लाखांचे बक्षीस देण्यात येणार आहे.

हेही वाचा-'जैश'च्या दोन संशयित दहशतवाद्यांना अटक; दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाची कारवाई

हेही वाचा-नाराज सदाभाऊंची मनधरणी करण्यात भाजपाला यश; पुणे पदवीधर निवडणूकीतून रयतचा उमेदवार मागे

ABOUT THE AUTHOR

...view details