मुंबई - आशिया खंडातील सर्वात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. या धारावीत आटोक्यात आलेल्या कोरोनाने पुन्हा डोके वर काढले होते. मागील महिन्यात दिवसाला ७० हुन अधिक रुग्ण आढळून येत होते. त्यात गेल्या काही दिवसात घट झाली आहे. बुधवारी नवे ३ रुग्ण आढळून आले असून ६२ सक्रिय रुग्ण आहेत. यामुळे धारावीही कोरोनामुक्ती कडे वाटचाल करत असल्याचे चित्र दिसत आहे.
धारावीत ६२ ऍक्टिव्ह रुग्ण -
कोरोना धारावीतून हद्दपार होणार अशी स्थिती असतानाच फेब्रुवारीच्या मध्यापासून पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली होती. २ फेब्रुवारीला मुंबईत दिवसभरात ३३४ रुग्ण आढळून आले होते. ही रुग्णसंख्या एप्रिल महिन्यात ७ ते ११ हजारावर गेली होती. धारावीतही कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होऊ लागली. धारावीत ८ मार्चला १८ रुग्ण आढळले होते. त्यानंतर सतत रुग्णांच्या संख्येत वाढ होत होती. १८ मार्चला ही रुग्णसंख्या ३० वर पोहचली होती. ११ एप्रिलला धारावीत ७६ नवे रुग्ण आढळून आले होते. मात्र मुंबईतील रुग्णसंख्या घटू लागली आहे त्याचप्रमाणे धारावीतील रुग्णसंख्याही घटू लागली आहे. मे महिन्यात १ मे ला २८ रुग्ण आढळून आले होते. त्यानंतर त्यात घट होत आली आहे. १०, ११, १३, २२ मे ला दिवसाला ९ रुग्णांची नोंद झाली आहे. २५ मे ला ७ रुग्णांची नोंद झाली आहे. तर बुधवारी ३ रुग्णांची नोंद झाली आहे. धारावीतील एकूण रुग्णसंख्या ६७९८ वर गेली आहे. त्यापैकी ६३८२ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून ६२ ऍक्टिव्ह रुग्ण आहेत.
धारावीत सहावेळा शून्य रुग्ण -