महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मोनो-मेट्रोच्या कामामुळे फुटलेल्या वाहिन्यांचा खर्च पालिका करणार वसूल - expenditure recover from MMRDA & DMRC

मेट्रो- मोनोच्या कामामुळे सातत्याने जल वाहिन्या, मलनीःसारण वाहिन्या तसेच रस्त्यांची खोदकामे केल्याने रस्तेही नादुरुस्त होत आहेत. याची दुरुस्ती करण्य़ासाठी पालिकेला कोट्यवधीचा फटका बसतो. हा खर्च एमएमआरडीए, डीएमआरसीकडून वसूल केला जाणार आहे. मोनो, मेट्रोच्या कामामुळे तुटलेल्या मलनीःसारण वाहिन्यांची दुरुस्ती व त्यासाठी लागणारा खर्च एमएमआरडीए व डीएमआरसी मार्फतच केला जाणार आहे.

फुटलेल्या मलनीःसारण वाहिन्या

By

Published : Oct 1, 2019, 9:09 AM IST

मुंबई - मुंबईत सर्वत्र मोनो आणि मेट्रो रेल्वेचे काम सुरु आहे. या कामामुळे पालिकेच्या विविध भागातील मलनीःसारण वाहिन्या फुटल्या आहेत. यामुळे पालिकेला कोट्यवधीचा भुर्दंड सहन करावा लागतो आहे. या वाहिन्यांच्या दुरुस्तीसाठी पालिकेला ७३ कोटी रुपयांचा खर्च येणार आहे. पालिका हा खर्च आता एमएमआरडीए व डीएमआरसी कडून वसूल करणार आहे.

मोनो-मेट्रोच्या कामामुळे फुटलेल्या वाहिन्यांचा खर्च पालिका वसूल करणार

हेही वाचा -गुजरातमध्ये चालकाचे नियंत्रण सुटल्याने बसला भीषण अपघात, २१ ठार

पालिकेच्या माध्यमातून रस्ते, नाले, उद्याने, जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्यांच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. मात्र, मेट्रो-मोनो रेल्वेच्या कामांमुळे मुंबईत अनेक ठिकाणी जलवाहिन्या, मलनि:सारण वाहिन्या फुटण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे पालिकेला ही कामे दुरुस्ती किंवा नव्याने करावे लागत आहेत. करी रोड येथे पालिकेला ८०० मिमी. व्यासाची मलनि:सारण वाहिनी आणि मालाड येथे १२०० मिमी व्यासाची मलनि:सारण वाहिनी सूक्ष्म बोगदा पद्धती टाकावी लागणार आहे. याशिवाय अंधेरी, चेंबूर, दहिसर, कांदिवली या ठिकाणीही मलनि:सारण वाहिन्यांची कामे करण्यात येणार आहेत. त्यासाठी पालिकेला एकूण ७३ कोटी ९८ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. त्यापैकी काही कोटींची रक्कम मेट्रो व मोनो रेल्वेमुळे फुटलेल्या मलनि:सारण वाहिन्यांच्या कामांना फटका बसतो आहे.

हेही वाचा -आदित्य ठाकरे वरळीतून मैदानात, ठाकरे घराण्याची परंपरा मोडीत

मेट्रो- मोनोच्या कामामुळे सातत्याने जल वाहिन्या, मलनीःसारण वाहिन्या तसेच रस्त्यांची खोदकामे केल्याने रस्तेही नादुरुस्त होत आहेत. याची दुरुस्ती करण्य़ासाठी पालिकेला कोट्यवधीचा फटका बसतो. हा खर्च एमएमआरडीए, डीएमआरसीकडून वसूल केला जाणार आहे. मोनो, मेट्रोच्या कामामुळे तुटलेल्या मलनीःसारण वाहिन्यांची दुरुस्ती व त्यासाठी लागणारा खर्च एमएमआरडीए व डीएमआरसी मार्फतच केला जाणार आहे.

हेही वाचा -... म्हणून संभाजी भिडे बुद्धांना घाबरतात, त्यांची विचारसरणी विषारी -तुषार गांधी

काही ठिकाणी एमएमआरडीए, डीएमआरसी हे स्वतः त्यांच्या कंत्राटदारांमार्फत कामे करणार आहेत. तर काही ठिकाणी पालिकेला कामे करण्याबाबत विनंती केली असून येणारा खर्च एमएमआरडीए व डीएमआरसी यांच्याकडून वसूल केला जाणार असल्याचे पालिकेने स्पष्ट केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details