महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : महापरिनिर्वाण दिनासाठी सोयी सुविधांसह महापालिका सज्ज - डॉ. बाबासाहेब आंबेडकर ६३ वा महापरिनिर्वाण दिन

लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर येणार्‍या अनुयायांमध्ये आबालवृद्धांचा समावेश असतो. या अनुयायांना दादर शिवाजी पार्क, चैत्यभूमी, राजगृह, हिंदू कॉलनी, दादर रेल्वे स्थानक, कुर्ला एलटीटी स्थानक, डॉ. आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) आदी भागात महापालिकेतर्फे सुविधा पुरवल्या जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या निवासाची, खाण्या-पिण्याची आणि विश्रांतीची सुविधा महापालिकेकडून करण्यात आली आहे.

din
महापरिनिर्वाण दिनासाठी सोयी सुविधांसह महापालिका सज्ज

By

Published : Dec 4, 2019, 9:14 AM IST

मुंबई - ६ डिसेंबरला भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा ६३वा महापरिनिर्वाण दिन आहे. महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन करण्यासाठी देशभरातून २५ लाखांहून अधिक अनुयायी दादर चैत्यभूमी येथे येतात. या अनुयायांना शहरातील विविध ठीकाणी नागरी सुविधा पुरवण्यासाठी महापालिका सज्ज झाली आहे.

महापरिनिर्वाण दिनासाठी सोयी सुविधांसह महापालिका सज्ज

लाखोंच्या संख्येने चैत्यभूमीवर येणार्‍या अनुयायांमध्ये आबालवृद्धांचा समावेश असतो. या अनुयायांना दादर शिवाजी पार्क, चैत्यभूमी, राजगृह, हिंदू कॉलनी, दादर रेल्वे स्थानक, कुर्ला एलटीटी स्थानक, डॉ. आंबेडकर महाविद्यालय (वडाळा) आदी भागात महापालिकेतर्फे सुविधा पुरवल्या जातात. दरवर्षीप्रमाणे यंदाही त्यांच्या निवासाची, खाण्या-पिण्याची आणि विश्रांतीची सुविधा महापालिकेकडून करण्यात आली आहे. भारत स्काऊट गाईड हॉल येथे भिक्कूंच्या निवासाची व्यवस्था करण्यात आली आहे.

शिवाजी पार्क परिसरात एक लाख चौरस फुटांच्या मंडपाची व्यवस्था, चैत्यभूमी येथे दर्शनासाठी उभ्या असणाऱया अनुयायांसाठी उन्हापासूनच्या संरक्षणासाठी छत, पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. अभिवादनाच्या रांगेमधील अनुयायांना बसण्यासाठी १५० बाकड्यांची सोय करण्यात आली आहे. चैत्‍यभूमी येथील आदरांजलीचे मोठय़ा पडद्यांवर थेट प्रक्षेपण केले जाणार असल्याची माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

हेही वाचा -महापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायी शिवाजी पार्कमध्ये येण्यास सुरूवात

शिवाजी पार्क मैदानात ४६९ स्टॉल्सची रचना, पिण्याच्या पाण्याच्या ३८० नळांची व्यवस्था, १६ टँकर्स, चैत्यभूमी, शिवाजी पार्क परिसरात फ्लेक्स बॅनर्स, होर्डिंग्ज व दिशादर्शक फलक, शिवाजी पार्क मैदान व परिसरात १८ फ‍िरती शौचालये (१८० शौचकुपे), रांगेत असणाऱया अनुयायांसाठी ४ फ‍िरती शौचालये (४० शौचकुपे), फायबरचे २०० तात्‍पुरते स्‍नानगृह व ६० तात्‍पुरती शौचालये, इंदू मिलमागे फायबरची तात्‍पुरती ६० शौचालये व ६० स्‍नानगृह, २६० फिरती शौचालये, ३०० चार्जिंग पॉईंटस् उपलब्ध केले आहेत, शिवाजी पार्क मैदानात धुळीचा त्रास रोखण्‍यासाठी पायवाटांवर आच्‍छादन टाकण्यात आली आहेत, चैत्‍यभूमीलगतच्‍या चौपाटीवर सुरक्षारक्षकांसह बोटींची व्‍यवस्‍था करण्यात आली आहे. दादर (पश्चिम) रेल्‍वे स्‍थानकाजवळ आणि एफ उत्तर विभाग कार्यालय, चैत्‍यभूमी व शिवाजी पार्क, दादर (पूर्व) स्‍वामिनारायण मंदिराजवळ नियंत्रण कक्ष व माहिती कक्ष तसेच ‘राजगृह’ येथे नियंत्रण कक्ष आणि वैद्यकीय कक्ष कार्यान्वयीत करण्यात आला आहे.

आपत्कालीन व्यवस्थाही सज्ज

दादर येथील चैत्‍यभूमीवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्‍मारकाचे दर्शन घेण्‍यासाठी देशभरातून येणाऱया अनुयायांना आपत्‍कालीन परिस्थितीत तात्‍पुरत्‍या निवाऱयाची सोय म्‍हणून शिवाजी पार्क परिसरातील महापालिकेच्‍या ७ शाळा निश्चित करण्‍यात आल्‍या आहेत. या शाळांमध्ये आवश्‍यक त्‍या सर्व नागरी सेवा-सुविधा सुसज्‍ज ठेवण्‍यात आल्‍या असून सुमारे १० हजार अनुयायांची त्यात व्‍यवस्‍था होऊ शकते, अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details