मंबई - महापालिका आयुक्त हे मागासवर्गीय अधिकारी व कर्मचारी वर्ग यांच्या विरोधात आहेत असा आरोप पालिका मागासवर्गीय कामगार संघटनेनी केला आहे. मागासवर्गीयांच्या विविध मागण्या आणि अडचणींकडे वेळोवेळी प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. यामुळे कर्मचारी वर्ग अस्वस्थ असून त्यांच्या कामावर परिणाम होत आहे. यामुळे त्वरित त्यांच्या मागण्या आणि अडचणी दूर करून त्यांच्याशी पालिका आयुक्तानी भेट करून चर्चा करावी. या मागणीसाठी पालिका मागासवर्गीय कर्मचारी संघटनेने आज पत्रकार परिषद घेतली.
महापालिका आयुक्त हे मागासवर्गीय विरोधी, महापालिका मागासवर्गीय कामगार संघटनेचा आरोप - municipal commissioner
पालिकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वेळोवेळी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. परंतु त्यांनी काही लक्ष दिले नाही. या प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे संघटनेनी दाद मागितली आणि आता आयोगाने त्याची दखल घेतली आहे.
पालिकेतील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी वेळोवेळी पालिका प्रशासनाचे लक्ष वेधले आहे. परंतु त्यांनी काही लक्ष दिले नाही. या प्रश्नांची सोडवणूक न झाल्याने राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगाकडे संघटनेनी दाद मागितली आणि आता आयोगाने त्याची दखल घेतली आहे. आयोगाने मनपा आयुक्त मुंबई यांना बोलावले असुन नवी दिल्ली येथील कार्यालयात २९ मे'ला याची सुनावणी आयोजित केली आहे. दिल्ली येथे जाण्याअगोदर मनपा आयुक्तानी व्यक्तीशः लक्ष घालून प्रश्नांची सोडवणूक केली तर आयोगाला तशी लेखी माहिती असोसिएशनच्या वतीने देण्यात येईल, असे संघटनेच्या सेक्रेटरीने सांगितले.
पालिकेच्या काही कार्यलायाचा ठिकाणी आता खुल्या वर्गाच्या उमेदवारांची नेमणूक करण्यात येत असून मनपा आयुक्त, अतिरिक्त आयुक्त हे जाणूनबूजून मागासवर्गीयाना डावलत आहेत. मनपा आयुक्त बैठकीला हजर राहणार नाहीत. दिल्ली येथे मनपा आयुक्त बैठकीला हजर राहीले नाहीत तर त्यांना समन्स बजावण्यात यावे. मुंबई मनपा आयुक्त हे जातीवादी असुन मागासवर्गीयांना मोठे पद मिळू देत नाहीत, असा आरोप संघटनेने पालिका आयुक्तांवर केला आहे.