मुंबई : मुंबईत मोठ्या प्रमाणात काम सुरू असतात. त्यामध्ये बांधकाम आणि निष्कासन याचा कचरा मोठ्या प्रमाणात असतो. बांधकामाच्या ठिकाणची धूळ कमी करण्यासाठी बांधकाम व्यावसायिकांना मार्गदर्शक तत्वे तयार करण्यात आली आहेत. त्यात इमारतीच्या बाह्य भागात धुळरोधक पडदे लावणे, धुळरोधक पडद्यावर व तळ मजल्यावर मोकळ्या जागेत पाणी शिंपडने, वाहनांची चाके धुणे, वाहनांची चाके धुणे, डेब्रिज पासून सुरक्षेसाठी जाळी बसवणे, बांधकामाचा कचरा प्रक्रिया करण्यासाठी ६०० टन प्रतिदिन क्षमतेचे २ प्रकल्प उभारले जाणार आहेत, आय ओ डी देताना जी आय पडदे उभारणे, आर एम सी प्लांट साठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे ना हरकत प्रमाणपत्र घेणे आवश्यक करण्यात आले आहे.
वायू शुद्धीकरण प्रणाली कार्यान्वित केली जाणार : गेल्या दशकात एकूण प्रदूषणात रस्त्यावरील धुळीचा वाटा दुपटीहून अधिक वाढला आहे. रस्ते बांधणी सामग्री, खडी, काँक्रिट यामुळे धुळीचे प्रमाण वाढले आहे. यावर उपाय म्हणून रस्त्यांवरील धूळ साफ करण्यासाठी यांत्रिकी ई पॉवर स्वीपरचा वापर करणे, रस्ते आणि पदपथांवरील धुळीस अटकाव करण्यासाठी स्प्रिंकलर खरेदी करणे, मिस्टिंग उपकरणे कार्यान्वित करणे, वायु शुद्धीकरण युनिट कार्यान्वयित करणे, धूळ कमी करण्यासाठी वायू शुद्धीकरण प्रणाली कार्यान्वित करणे या उपाययोजना केल्या जाणार आहेत.
रस्त्यावर या केल्या जाणार उपाययोजना : वाहनांच्या वापरात झालेल्या प्रचंड वायू वाढीमुळे वायू प्रदूषणाचे रस्ते वाहतुकीचा मोठा वाटा आहे मुंबई शहरात नागरिकांचा खाजगी वाहतूक कडे कल कमी करण्यासाठी सार्वजनिक वाहतूक मागणी व्यवस्थापनावर लक्ष केंद्रित करण्यात येणार आहे खाजगी वाहन ऐवजी सार्वजनिक आणि शेअर वाहनांचा वापर करणे जीवाश्म इंधनावर चालणारे वाहनांचा वापर कमी करून पर्यावरण स्नेही पर्यायांची मागणी वाढवण्याकडे लक्ष दिले जाणार आहे यासाठी बेस्टकडून 3000 इलेक्ट्रिकल बसेस खरेदी करण्यात येत आहेत मालिकेच्या जुन्या डिझेल आणि पेट्रोल वाहनांचे सीएनजी वाहनांमध्ये रूपांतर केले जाते 258 वाहतूक नाक्यावर पूर्णपणे वाहतूक अनुकूल नियंत्रण प्रणाली यापूर्वीच कार्यरत करण्यात आली आहे या प्रणालीचे दर जुन्नती करण्यात येणार आहे वाहतूक प्रवाह व प्रदूषणावरील परिणामाचा अभ्यास करून 395 वाहतूक नाक्यावर सदर प्रणाली बसवण्यात येणार आहे.
कचरा प्रक्रिया केंद्र उभारली जाणार : कचरा जाळल्यामुळे आणि अयोग्य पद्धतीने कचऱ्याची विल्हेवाट लावल्यामुळे धूळीकणांच्या उत्सर्जन वायू प्रदूषणात भर पडते. यासाठी घरोघरी कचरा वर्गीकरणासाठी नागरिकांची संवाद साधून जागृती निर्माण केली जाणार आहे. कचरा जाळण्यावर देखरेख व बंदीची अंमलबजावणी केली जाणार आहे. देवनार क्षेपणभूमी येथे 600 टन प्रतिदिन क्षमतेचा वेस्ट एनर्जी प्रकल्प प्रगतीपथावर आहे. देवनार क्षेपणभूमी येथे पूर्वापर असलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग केले जाणार आहे. आठ ठिकाणी चार टन प्रतिदिन क्षमतेच्या घरगुती घातक कचरा प्रक्रिया केंद्राची उभारणी केली जाणार आहे.
शहरी हरीत प्रकल्प : मुंबईत १ लाख झाडे लावली जाणार आहेत. मरोळ इंडस्ट्रीज असोसिएशन अर्बन फॉरेस्ट मिठी नदीच्या बाजूला झाडे लावली जाणार आहेत. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे उद्यानात ४५००, महाकाली केव्हज अर्बन फॉरेस्ट येथे ३० हजार, स्वामी विवेकानंद उद्यान येथे ९ हजार, मरोळ भारत वन उद्यान येथे ६ हजार झाडे लावली जाणार आहेत. रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून ग्रीन बफर तयार केले जाणार आहे.