मुंबई- मुंबईत गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. यादरम्यान मुंबईत मृत्यू दर 5 टक्के होता. कोरोनाच्या प्रसारादरम्यान काही महिने मुंबईत रोज 30 ते 40 रुग्णांचा मृत्यू होत होता. पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे आणि सुरू केलेल्या 'सेव्ह द लाईव्हज' या उपक्रमामुळे मृत्यूची संख्या कमी करण्यात पालिकेला यश आले आहे. सध्या दिवसाला 2 ते 5 मृत्यू होत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे मुंबईतील मृत्यूदर
5.4 टक्क्यावरून 3.50 टक्के इतका कमी करण्यात महापालिकेला यश आले आहे.
कोरोना रुग्ण व मृत्यूची आकडेवारी
मुंबईत 11 मार्च, 2020ला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. 17 मार्चला कोरोनामुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला. तेव्हापासून 12 मार्चपर्यंत मुंबईत एकूण 3 लाख 40 हजार 277 रुग्णांची नोंद झाली आहे. 3 लाख 15 हजार 379 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 11 हजार 519 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 9 हजार 973 मृत्यू हे 50 वर्षांवरील नागरिकांचे झाले आहेत. मुंबईत सध्या 3.50 टक्के इतका मृत्यूदर आहे.
दरदिवशी होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी
मागील वर्षी मे महिन्यात दिवसाला सुमारे 5, जून महिन्यात दिवसाला सुमारे 40, जुलै महिन्यात दिवसाला सुमारे 6, ऑगस्ट महिन्यात दिवसाला सुमारे 45, सप्टेंबर महिन्यात दिवसाला सुमारे 35, ऑक्टोबर महिन्यात दिवसाला सुमारे 43, नोव्हेंबर महिन्यात दिवसाला सुमारे 25, डिसेंबर महिन्यात दिवसाला सुमारे 9, 2021 साली जानेवारी महिन्यात दिवसाला सुमारे 9, 1 फेब्रुवारीला 8, 10 फेब्रुवारीला 4, 20 फेब्रुवारीला 3, 28 फेब्रुवारीला 5, 1 मार्चला 4, 2 मार्चला 2, 10 मार्चला 5, 11 मार्चला 4, 12 मार्चला 4 जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. ही आकडेवारी पाहता दरदिवशी होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट होत आहे. कोरोनाच्या सुरुवातीच्या काही महिन्यात 30 ते 40 रुग्णांचा मृत्यू होत होता. हे प्रमाण कमी करण्यात पालिकेला यश आले आहे. सध्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण स्थिर असून ते आणखी कमी करून शून्यावर आणण्याचे प्रयत्न असल्याचे पालिकेतील आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
सर्वाधिक मृत्यू 'या' वयोगटातील