मुंबई - महापालिकेने २०१७-१९ या दोन वर्षात ८ हजार ८७९ खड्डे बुजविण्यासाठी तब्बल १५ कोटी ७१ लाख २९ हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खर्च पाहता पालिकेने एक खड्डा बुजवायला तब्बल १७ हजार रुपये खर्च केला असल्याचे समजते. शकील अहमद शेख यांनी माहिती अधिकाराचा वापर करून ही माहिती मिळवली.
अबब! मुंबई महापालिकेकडून एक खड्डा बुजवायला १७ हजारांचा खर्च - मुंबई महापालिका रस्ते
मुंबई महापालिकेने २०१७-१९ या दोन वर्षात ८ हजार ८७९ खड्डे बुजविण्यासाठी तब्बल १५ कोटी ७१ लाख २९ हजार रुपये खर्च केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. हा खर्च पाहता पालिकेने एक खड्डा बुजवायला तब्बल १७ हजार रुपये खर्च केला असल्याचे समजते.
रस्ते बांधकामासाठी पालिकेकडून कोट्यवधी रुपये खर्च केला जातो. मात्र निकृष्ट दर्जाच्या कामांमुळे अल्पावधीतच रस्त्यांवर खड्डे पडून रस्त्यांची चाळण होते. हे खड्डे बुजवण्यासाठी पुन्हा कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. २०१३ ते ३१ जुलै २०१९ पर्यंत मुंबईतील रस्त्यांवर खड्ड्यांच्या एकूण २४१४६ ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्यापैकी २३३८८ खड्डे भरल्याचा दावा महापालिकेने केला आहे. तसेच २०१३ ते २०१९ या कालावधीत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठीच्या एकूण तरतूद निधीपैकी आतापर्यंत ११३ कोटी ८४ लाख ७७ हजार रुपये खर्च झाले आहेत, अशी माहितीदेखील शकील अहमद शेख यांनी दिली आहे.