मुंबई - मुंबईतील रस्त्यांवर पडलेले 90 टक्के खड्डे बुजवल्याचा दावा पालिकेने केला आहे. 1 ऑगस्टपर्यंत खड्डे बुजण्याच्या फक्त 414 तक्रारी शिल्लक असल्याची माहितीही पालिकेने दिली. मात्र, हे खड्डे भरण्यासाठी पालिकेने गेल्या 6 वर्षात 113 कोटी रुपये खर्च केले आहेत. 2013-14 या वर्षात एका खड्ड्यावर तब्बल 2 लाख 3 हजार 966 रुपये खर्च झाला असल्याचे माहितीच्या अधिकारात स्पष्ट झाले आहे.
आरटीआय कार्यकर्ते शकील अहमद यांनी पालिकेकडे सन 2013 पासून खड्डयांबाबत आलेल्या ऑनलाइन तक्रारी आणि त्यावर केलेला खर्च याबाबत माहिती मागितली होती. पालिकेने दिलेल्या माहितीनुसार 2013 पासून 31 जुलै 2019 पालिकेकडे खड्ड्यांच्या 24 हजार 146 ऑनलाइन तक्रारी प्राप्त झाल्या. यातील 23 हजार 388 तक्रारींचे निवारण पालिकेने केले.
हेही वाचा - डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या तैलचित्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण
2013 ते 2019 या कालावधीत मुंबईतील रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी एकूण 175 कोटी 51 लाख 86 हजार रुपये आर्थिक तरतूद केली होती. त्यातील 113 कोटी 84 लाख 77 हजार हजार रुपये आतापर्यंत खड्डे भरण्यासाठी खर्च झाले आहेत.
हेही वाचा - म्हाडाने नोटीस दिलेली इमारत कोसळली, १७ जणांना सुखरूप बाहेर काढले