महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Resident Doctors Strike निवासी डॉक्टरांच्या मागण्यांबाबत मुंबई महापालिका सकारात्मक - मार्डची माहिती - निवासी डॉक्टरांनी आयुक्तांची भेट घेतली

आपल्या विविध मागण्यासाठी निवासी डॉक्टरांनी मुंबईसह ( Resident Doctors Strike In Mumbai ) राज्यभरात संप पुकारला होता. मुंबई महापालिकेतील डॉक्टरांनीही संपात सहभागी होत आपल्या मागण्या प्रशासनाकडे केल्या होत्या. त्यावर मंत्री गिरीश महाजन ( Minister Girish Mahajan ) यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेण्याची सूचना केली होती. आज निवासी डॉक्टरांनी आयुक्तांची भेट घेतली. त्यावर महापालिका प्रशासन ( Mumbai Municipal Corporation ) निवासी डॉक्टरांच्या मागण्यांसाठी सकारात्मक असल्याची माहिती मार्डचे मार्डचे डॉ. सचिन पट्टीवार यांनी दिली.

Mumbai Municipal Corporation Positive
निवासी डॉक्टर

By

Published : Jan 6, 2023, 11:27 AM IST

मुंबई - आपल्या विविध मागण्यांसाठी मुंबईसह राज्यभरातील निवासी डॉक्टरांनी ( Resident Doctors Strike In Mumbai ) दोन दिवस संप केला होता. हा संप मागे घेताना पालिका मार्डने आयुक्तांशी संपर्क साधावा असे निर्देश मंत्री गिरीश महाजन ( Minister Girish Mahajan ) यांनी सांगितले होते. त्यानुसार अतिरिक्त आयुक्तांकडे झालेल्या चर्चेनंतर संचालक वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य यांना पुढील कार्यवाही करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. महापालिका प्रशासन ( Mumbai Municipal Corporation ) आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असल्याचे महापालिका मार्डचे डॉ. सचिन पट्टीवार यांनी सांगितले.

डॉक्टरांचा संपमहागाई भत्ता, सहयोगी प्राध्यापकांची रिक्त पदे भरणे, वसतीगृहाच्या समस्या, मुंबई महानगरपालिकेकडून दर महिना मिळणारा प्रलंबित कोविड भत्ता या कारणांमुळे राज्यभरातील सात हजार निवासी डॉक्टरांनी २ आणि ३ जानेवारीला काम बंद आंदोलन केले. मुंबई महानगरपालिकेच्या केईएम, नायर, सायन, कूपर आदी रुग्णालयांमध्ये २ हजार डॉक्टर्स कार्यरत आहेत. या डॉक्टरांना कोविड काळातील भत्ता, डीए तसेच वसतिगृह हे प्रश्न सोडवण्यात ( Resident Doctors Demand ) आलेले नाहीत. यासाठी पालिका रुग्णालयातील निवासी डॉक्टरांनीही संपात सहभाग घेतला.

कोविड भत्ता मंजूरडॉक्टरांचा संप सुरु असल्याने रुग्णांना त्रास होऊ नये म्हणून वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरीश महाजन यांनी डॉक्टरांसोबत बैठक घेऊन संप मागे घेतल्याची घोषणा केली. यावेळी पालिकेच्या निवासी डॉक्टरांचे प्रश्न सोडवण्यासाठी पालिका आयुक्त इकबाल सिंग चहल यांच्याशी भेटावे असे मंत्री महाजन यांनी सांगितले होते. डॉक्टरांनी आयुक्तांशी भेट घेतल्यावर कोविड भत्त्याची फाईल मंजूर झाल्याचे आयुक्तांनी सांगितले. इतर मागण्यांबाबत अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांची भेट घेण्यास आयुक्तांनी सांगितले होते.

महापालिका सकारात्मकआज अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांच्याशी डॉक्टरांची भेट झाली. या भेटीत सकारात्मक चर्चा झाली असून डीए बाबत सरकारचा जीआर पालिकेच्या संचालक वैद्यकीय शिक्षण आणि आरोग्य यांना देऊन पुढील कार्यवाही करण्यास सांगण्यात आले आहे. यामुळे आता निवासी डॉक्टर आणि पालिकेच्या वैद्यकीय शिक्षण संचालक यांच्याकडे पाठपुरावा केला जाणार आहे. महापालिका प्रशासन आमच्या मागण्यांबाबत सकारात्मक असून लवकरच मागणी पूर्ण होतील, अशी माहिती मार्डचे डॉ. सचिन पट्टीवार यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details