महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई : बकरी ईदसाठी पालिकेचे देवनार पशुसंवर्धन गृह सज्ज - शेळ्या-मेंढ्या देवनार पशुसंवर्धन गृहात

'बकरी ईद' सणासाठी मुंबई महानगर पालिकेचे मानखुर्द देवनार येथील पशुसंवर्धन गृह सज्ज झाले आहे. या सणासाठी देशभरातून शेळ्या-मेंढ्या देवनार पशुसंवर्धन गृहात दाखल झाल्या आहेत. या वर्षी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक शेळ्या मेंढ्या, तर १० हजारांपेक्षा अधिक मोठी जनावरे(म्हैस, रेडा आदी) येतील असा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

मुंबई : बकरी ईदसाठी पालिकेचे देवनार पशुसंवर्धन गृह सज्ज

By

Published : Aug 10, 2019, 6:21 PM IST

मुंबई -'बकरी ईद' सणासाठी मुंबई महानगर पालिकेचे मानखुर्द देवनार येथील पशुसंवर्धन गृह सज्ज झाले आहे. या सणासाठी देशभरातून शेळ्या-मेंढ्या देवनार पशुसंवर्धन गृहात दाखल झाल्या आहेत. या वर्षी सुमारे दोन लाखांपेक्षा अधिक शेळ्या मेंढ्या, तर १० हजारांपेक्षा अधिक मोठी जनावरे(म्हैस, रेडा आदी) येतील असा अंदाज पालिका प्रशासनाने व्यक्त केला आहे.

'बकरी ईद' सणाच्या निमित्ताने देशभरातील वेगवेगळ्या राज्यांमधून येणाऱ्या विक्रेत्यांसह छोट्या, शेळ्या, मेंढ्या व मोठी जनावरे देवनार पशुसंवर्धन गृहात दाखल झाली आहेत. पशुसंवर्धन गृह परिसरात आलेल्या विक्रेते, जनावरेन तसेच ग्राहकांसाठी महापालिकेने विविध सेवा सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत. देवनार पशुसंवर्धन गृह परिसरात छोट्या जनावारांची चोरी होण्याच्या काही घटना यापूर्वी घडल्या होत्या. ज्याबाबत विक्रेत्यांकडून वेळोवेळी तक्रारी आल्या होत्या. त्याला आळा बसावा यासाठी महापालिका प्रशासनान यावर्षी अधिक काटेकोर उपाययोजनांची अंमलबजावणी करणार आहे. पास वितरण पद्धतीही आता आणखी सुधारित करण्यात आली आहे. याअंतर्गत व्यापाऱ्यांना देण्यात येणारी ओळखपत्रे यावर्षी प्रथमच 'स्मार्ट कार्ड' स्वरुपात असणार आहेत.

देवनार पशुसंवर्धन गृहात ये-जा करताना या 'बारकोड' असलेल्या 'स्मार्ट कार्ड स्वरुपाच्या प्रवेशपत्रांचे 'स्कॅनींग' केले जाणार आहे. शेळ्या-मेंढ्या विक्रीच्या गेटपासवर देखील बारकोडींग असणार आहे. या बारकोडींगमुळे एखाद्या विक्रेत्याने किती शेळ्या-मेंढ्या विक्रीसाठी आणल्या व त्यापैकी कितींची विक्री झाली, याबाबतची माहिती संगणकाच्या एका 'क्लिक'वर सहजपणे उपलब्ध होणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे.

जनावरांच्या माहितीसाठी तीन डिजिटल बोर्ड -
देवनार पशुवधगृहात किती जनावरे आली, किती जनावरे विकली गेली, व सध्या किती जनावरे शिल्लक आहेत याची माहिती इच्छुकांना त्वरित व सहजपणे मिळावी यासाठी देवनार पशुसंवर्धन गृह परिसरातील दर्शनीय ठिकाणी ३ डिजीटल बोर्ड बसविण्यात आले आहेत. या डिजिटल बोर्डवरील माहिती दर ४ तासांनी अद्ययावत केली जात आहे.

अशा असणार सुविधा -
पिण्याच्या पाण्याच्या पुरवठ्यासाठी १ हजार लीटरच्या १०० टाक्या बसविण्यात आल्या आहेत. तर जनावरांच्या पिण्याच्या पाण्याच्या दृष्टीने प्रत्येक वाड्याजवळ ५ हजार लीटरच्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत. छोटी जनावरे ठेवण्यासाठी आणखी ४० हजार चौ.मी. आकाराचे एक नियमित स्वरुपाचे 'शेड' पशुवधगृहाच्या परिसरात आहे. यासोबतच ५० हजार चौ.मी.चे एक अतिरिक्त तात्पुरते 'शेड' देखील उभारण्यात आले आहे. तर मोठ्या जनावरांसाठी २५ हजार चौ. मी. आकाराचे नियमित स्वरुपातील शेड उपलब्ध असणार आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details