मुंबई -मुंबईसह गिरणी कामगारांच्या लढ्याचा इतिहास सांगणाऱ्या टेक्स्टाईल म्युझियमच्या जागेची पाहणी शनिवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. भायखळा मधील युनायटेड इंडिया या बंद मिलच्या जागेवर हे म्युझीयम उभारण्यात येणार आहे.
हे ही वाचा- आदित्य यांना वरळीतून निवडणूक लढवण्यासाठी उद्धव ठाकरेंना घालणार साकडे - अनिल परब
या म्युझियममध्ये मुंबईची भरभराट कशी होत गेली हे देखील सांगण्यात येणार आहे. 44 हजार चौरस मीटर जागेत हा प्रकल्प होणार आहे. या ठिकाणी लवकरच म्युझियम व्यतिरिक्त जागेवर उद्योग येणार असून त्यांचा देखील विकास होणार आहे. मात्र, म्युझियमची जागा वगळता राहिलेल्या इतर जागेवर गिरणी कामगारांच्या मुलांना घर तयार करून द्यावीत, असे मत उद्धव ठाकरे यांनी यावेळी व्यक्त केले.