महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Action Against Plastic Of BMC : महापालिकेची प्लास्टिक विरोधात कारवाई थंडावली, केवळ ५ लाख रुपये दंड वसूल - action against plastic has cooled down

राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबईमध्ये (Mumbai Municipal Corporation) प्लास्टिक विरोधी कारवाई केली जात आहे. २० दिवसांत महानगरपालिकेने फक्त ४०० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त केले. तर ५ लाख रुपये दंड (only Rupees 5 lakh fine will be collecte) dवसूल केला. यावरून कारवाईचा वेग थंडावलेला (action against plastic has cooled down) असल्याचे, आकडेवारीवरून समोर आले आहे. Action Against Plastic Of BMC

Action Against Plastic Of BMC
प्लास्टिक विरोधात कारवाई थंडावली

By

Published : Oct 31, 2022, 7:21 PM IST

मुंबई :राज्य सरकारच्या निर्णयानुसार मुंबईमध्ये (Mumbai Municipal Corporation) प्लास्टिक विरोधी कारवाई केली जात आहे. कोरोना काळात ही कारवाई थांबली होती. १ जुलैपासून कारवाई पुन्हा सुरु करण्यात आली. तेव्हापासुन आतापर्यंत पालिकेने २९०६ किलोग्रॅम प्लास्टिक जप्त केले. तर २९ लाख रुपये दंड वसूल केला. आणि आता २० दिवसांत महानगरपालिकेने फक्त ४०० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त केले. तर ५ लाख रुपये दंड वसूल (only Rupees 5 lakh fine will be collecte) करण्यात आला आहे. यावरून कारवाईचा वेग थंडावलेला (action against plastic has cooled down) असल्याचे, आकडेवारीवरून समोर आले आहे. Action Against Plastic Of BMC

राज्यात प्लास्टिकवर बंदी : मुंबईमध्ये २६ जुलै २००५ रोजी जलप्रलय आला होता. यावेळी प्लास्टिक पिशव्यांमुळे गटारे नाल्यातील पाण्याचा निचरा झाला नसल्याचे समोर आले होते. यासाठी राज्य सरकारने सिंगल युज प्लास्टिकवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला. जून २०१८ मध्ये राज्य सरकारने सिंगल युज प्लास्टिक वर बंदी घातली. ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लॅस्टिक पिशव्या विक्री, वापर करणारे व उत्पादन करणार्‍यांवर कारवाई करण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेने घेतला. महानगरपालिकेच्या लायसन्स विभागाकडून जून २०१८ ते मार्च २०२० पर्यंत प्रतिबंधित प्लास्टिकवर कारवाई करण्यात आली.



प्लास्टिक विरोधात कारवाई : १ जुलैपासून आतापर्यंत मागील चार महिन्यांत केवळ २९०६ किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर २९ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. मागील १० ऑक्टोबरपर्यंत २५५१ किलो ग्रॅम प्लास्टिक जप्त व २४ लाख ७० हजार रुपयाचा दंड वसूल करण्यात आला होता. म्हणजे २० दिवसांत अवघे ४०० किलो ग्रॅम प्लास्टिक जप्त व पाच लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. दिवाळीत मोठ्या प्रमाणात प्लास्टिकचा वापर होत असल्याने पालिकेने दिवाळीतही प्लास्टिक कारवाई मोहिम सुरु ठेवली होती. मात्र २० दिवसांत फक्त ४०० किलोग्रॅम प्लास्टिक जप्त करण्यात आले. तर ५ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला आहे.


अशी केली जातेय कारवाई :उत्पादक, साठेदार, पुरवठादार, विक्रेते यांनी अधिसूचनेचे उल्लंघन केल्यास त्यांच्यावर महाराष्ट्र विघटनशील व अविघटनशील कचरा (नियंत्रण) अधिनियम २००६ च्या कलम ९ अन्वये प्रथम गुन्‍ह्यासाठी ५,००० रुपये, दुस-या गुन्‍ह्यासाठी १०,००० रुपये आणि त्यानंतरच्या गुन्‍ह्यासाठी ३ महिन्यांपर्यंत तुरुंगवास व २५,००० रुपये पर्यंत दंड वसूल करण्यात येत आहे. संबंधितांनी कायद्याचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेने केले आहे. Action Against Plastic Of BMC

ABOUT THE AUTHOR

...view details