महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

समुद्रात गणेशमूर्ती विसर्जनास बंदी नाही परंतु, कृत्रिम तलावात विसर्जन करा - मुंबई महापालिका

गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी समुद्रात जाण्यास बंदी महापालिकेद्वारे घालण्यात आल्‍याचे वृत्त समाजमाध्‍यमांत प्रसारित होत आहे. या अनुषंगाने गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्‍यावर बंदी महापालिकेद्वारे घालण्‍यात आल्याचा गैरसमज निर्माण झाला होता. मात्र, गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्‍यास बंदी नाही, असे महापालिकेने कळविले आहे.

गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास बंदी नाही
गणेश मूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्यास बंदी नाही

By

Published : Aug 12, 2020, 9:47 PM IST

मुंबई :मुंबईत कोरोनाचा प्रसार होत असल्याने सुरक्षेचा उपाय म्हणून कृत्रिम तलावात विसर्जन करावे असे आवाहन करण्यात आले आहे. मात्र, यामुळे मुंबईकरांनी समुद्रात गणेशमूर्तींचे विसर्जन करू नये असा गैरसमज निर्माण झाला आहे. याबाबत खुलासा करताना गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्‍यास बंदी नाही, असे पालिकेने कळविले आहे. तसेच महापालिकेने १६७ कृत्रिम तलाव निर्माण केले असून विसर्जन तलावात करण्याचे आवाहनही पालिकेकडून करण्यात आले आहे.

'कोविड १९' च्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने दिलेल्या निर्देशांनुसार यंदाचा गणेशोत्सव साधेपणाने, गर्दी टाळून व आवश्यक ती खबरदारी घेऊन साजरा करण्याच्या सूचना आणि आवाहन यापूर्वीच पालिकेनेही केले आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी समुद्रात जाण्यास बंदी महापालिकेद्वारे घालण्यात आल्‍याचे वृत्त समाजमाध्‍यमांत प्रसारित होत आहे. या अनुषंगाने गणेशमूर्तींचे समुद्रात विसर्जन करण्‍यावर बंदी महापालिकेद्वारे घालण्‍यात आल्याचा गैरसमज निर्माण झाला होता. मात्र, गणेशमूर्तींचे विसर्जन समुद्रात करण्‍यास बंदी नाही, असे महापालिकेने कळविले आहे. तसेच, नागरिकांच्या सेवेसाठी महापालिकेतर्फे बृहन्मुंबई क्षेत्रात १६७ कृत्रिम तलाव तयार करण्यात आलेली आहे. त्यामुळे, सोशल डिस्टन्सिंग राखून कृत्रिम तलावात अधिक प्रमाणात गणेशाचे विसर्जन करावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

गणेश भक्‍तांच्‍या सुविधेसाठी महापालिका क्षेत्रात विविध ठिकाणी अधिक संख्येने कृत्रिम तलाव तयार करण्याचे निर्देश महापालिकेच्या विभागीय कार्यालयांना यापूर्वीच देण्यात आले आहेत. ज्यानुसार आजपर्यंत १६७ कृत्रिम तलाव तयार करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. समुद्र किनार्‍यालगतच्या एक ते दोन किलो मीटरच्या परिसरात राहणाऱ्या गणेश भक्तांनी आपल्या गणेशमूर्तींचे विसर्जन हे समुद्रात करण्‍यास हरकत नाही. तर, इतरांनी म्‍हणजेच जे भाविक समुद्रालगत रहात नाहीत. अशांनी प्राधान्याने घरच्‍या-घरी किंवा कृत्रिम तलावातच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, अशी महापालिका प्रशासनाची सूचना आहे. महापालिका प्रशासन व राज्‍य शासन यांनी वेळोवेळी केलेल्‍या सूचना व आवाहनाचे पालन करावे. त्याचबरोबर 'कोविड १९' च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टन्सिंग, मास्‍क, सॅनिटायझर वापरुन हा उत्सव पार पाडावा, असे आवाहन पालिकेने केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details