मुंबई -मुंबई शहर सौंदर्यीकरण प्रकल्प अतिशय चांगला उपक्रम आहे. या प्रकल्पामुळे सेवांचा दर्जा उंचावण्यास मदत होईल. राज्यात सत्तेवर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई विकासाचा आराखडा तयार करण्यास सांगितले. त्यामुळे ते या योजनेचे शिल्पकार आहेत. मुंबई शहरात सर्व सुविधा युक्त आकांक्षीत स्वच्छतागृहे बांधण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रकल्पासाठी केंद्र सरकार निधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच, झोपडपट्टी परिसरात स्वच्छतागृहांची अधिकची तसेच पर्यायी व्यवस्था करण्याचा प्रयत्न सुरु आहे. सांडपाण्याच्या नियोजनासाठी कम्युनिटी वॉशिंग मशीन संकल्पना प्रत्यक्षात आणणे, झोपडपट्टी परिसरात अनेक ठिकाणी वीज नाही तेथे हँगिंग लाईट ही संकल्पना राबविण्याचे नियोजन सुरू आहे. ऐतिहासिक वारसा स्थळांचे महत्व जाणून त्याच पद्धतीने त्याची जपणूक करण्यात येणार आहे. स्काय वॉकच्या ठिकाणी एस्केलेटर्स बसविण्यात येतील. आगामी काळात मुंबई या ऐतिहासिक शहरातील वास्तू आणि रस्त्यांचा चेहरामोहरा बदललेला दिसेल, असेही फडणवीस यांनी सांगितले आहे.
BMC: स्वैराचाराने काम होऊ देऊ नका, उपमुख्यमंत्री फडणवीसांची आयुक्तांना तंबी - commissioner should work transparently
शिंदे फडणवीस सरकारच्या कामातील चुका शोधण्याचे काम विरोधकांकडून सुरू आहे. आम्हाला एकही तक्रार येऊ देऊ नका. पारदर्शक पद्धतीने काम करा. कोणतीही संस्था वाईट नसते. संस्था चालवणारे वाईट असतात. त्यामुळे स्वैराचार कोणतेही काम होऊ देऊ नका. कामांवर लक्ष ठेवा, सरकारचेही तुमच्या कामावर लक्ष राहील, अशी तंबी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनपा आयुक्तांना दिली आहे. ते आयोजित कार्यक्रमात बोलत होते.
तर परिवर्तन होणार नाही - राज्यात सत्तापालट झाल्यानंतर रस्त्यांवरील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लावण्याचा धडाका हाती घेतला आहे. मुंबईतील जवळपास १८०० किलोमीटरचे रस्ते सीसीरोड केले जातील. मुंबईकरांना सुरुवातीला सीसीरोडचा त्रास सहन करा, पुढे कधीही आवश्यकता लागणार नाही, अशा स्वरूपाचे दर्जेदार रोड तयार होणार असल्याची ग्वाही फडणवीस यांनी दिली. तसेच, निविदा प्रक्रियेत कठोर निर्णय घेतले आहेत. तेच ठेकेदार हद्दपार होऊन छोट्यातील छोट्या कंत्राटदारांना काम मिळतील. कामात पारदर्शकता येईल. मात्र, कोणतेही तक्रार येणार नाही याची खबरदारी घ्या. कारण संस्था वाईट नसते, संस्था चालवणारे वाईट असतात. स्वैराचाराने होणाऱ्या कामावर आता वचक ठेवा, अशी तंबी फडणवीस यांनी दिली आहे. तसेच, महापालिका श्रीमंत असेल आणि त्यात भ्रष्टाचार होत असेल तर परिवर्तन होणार नाही. त्यामुळे कामात पारदर्शकता ठेवा, अशा सूचना पालिका आयुक्त इक्बाल चहल यांना दिल्या आहेत.
संधी निर्माण करणारी राजधानी व्हावी - आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून मुंबई शहराच्या सौंदर्यीकरणाची वचनपूर्ती होत आहे. विकासाच्या बाबतीत सर्वांना अपेक्षित असलेला बदल आता पाहायला मिळेल, असे विधानसभा अध्यक्ष ॲड. नार्वेकर म्हणाले. तर, मुंबई शहर ही देशाची आर्थिक राजधानी आहेच. ती आता पर्यटन आणि रोजगार संधी निर्माण करणारी राजधानी व्हावी. त्या दिशेने राज्य शासनाचे प्रयत्न सुरू आहेत, असे महिला व बालविकास मंत्री लोढा यांनी स्पष्ट केले आहे.