मुंबई- गोरेगावच्या आंबेडकरनगर येथे नाल्यात वाहून गेलेल्या दिव्यांशच्या कुटुंबीयांची मुंबई महापालिकेचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर यांनी भेट घेतली. ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हणत महाडेश्वर यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
चिमुकला नाल्यात पडल्याप्रकरणी महापौर पीडित कुंटुंबाच्या भेटीला, दोषींवर कारवाईचे आदेश - high rain
ही घटना अत्यंत दुर्दैवी असल्याचे म्हणत महाडेश्वर यांनी दोषींवर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.

दोषींवर कारवाईचे आदेश
दोषींवर कारवाईचे आदेश
यावेळी त्यांनी घटना घडली त्या नाल्याची पाहणी केली. नाल्यात वाहून गेलेल्या दिव्यांशच्या घरी भेट देऊन महापौर महाडेश्वर यांनी त्याच्या आईचे सांत्वन केले. यावेळी सभागृह नेत्या विशाखा राऊत, स्थानिक नगरसेवक स्वप्नील टेंबवलकर देखील उपस्थित होते.
तेरा तास उलटुनही नाल्यात पडलेला दिव्यांश सापडला नाही. त्याच्या शोधासाठी अग्निशमन दल आणि आपत्ती निवारण पथक प्रयत्न करत आहेत. मात्र, अद्याप पर्यंत दिव्यांशचा पत्ता लागला नाही.