महाराष्ट्र

maharashtra

By

Published : Nov 4, 2022, 6:16 PM IST

ETV Bharat / state

Jeta movie : 'जेता'मधील 'धाव मर्दा धाव...' गाण्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या हस्ते अनावरण..

वनात अपयश नसेल तर यशाची चव गोड लागणारच नाही. जीवनात फक्त यश किंवा अपयश असूच शकत नाही. यश डोक्यात जाऊ द्यायचे नसते आणि अपयशाने खचून जायचे नसते, हा गुरुमंत्र जो पळतो तो सायुष्यात सुखी असतो. अश्याच आशयावर आधारित एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे, ज्याचे नाव आहे जेता. या चित्रपटात एका तरुणाच्या दैवाशी संघर्षाची सत्यकथा पहायला मिळणार आहे. जेता चित्रपटामधील 'धाव मर्दा धाव...' या गाण्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( MP Chhatrapati Udayanraje Bhosale ) यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

Etv Bharat
Etv Bharat

मुंबई : जीवनात अपयश नसेल तर यशाची चव गोड लागणारच नाही. जीवनात फक्त यश किंवा अपयश असूच शकत नाही. यश डोक्यात जाऊ द्यायचे नसते आणि अपयशाने खचून जायचे नसते, हा गुरुमंत्र जो पळतो तो सायुष्यात सुखी असतो. अश्याच आशयावर आधारित एक मराठी चित्रपट प्रदर्शित होत आहे, ज्याचे नाव आहे जेता. या चित्रपटात एका तरुणाच्या दैवाशी संघर्षाची सत्यकथा पहायला मिळणार आहे. जेता चित्रपटामधील 'धाव मर्दा धाव...' या गाण्याचे खासदार छत्रपती उदयनराजे भोसले ( MP Chhatrapati Udayanraje Bhosale ) यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

धाव मर्दा धाव गाणे रिलीज - जीवनाच्या या शर्यतीत प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात स्वत:च्या नावाचा झेंडा फडकवायचा असतो, पण प्रचंड जिद्द, चिकाटी आणि मेहनत घेणारेच या जगात यशस्वी होतात. समोर येणाऱ्या संकटांना पायदळी तुडवत इतिहास रचणाराच खरा 'जेता' बनतो. अशाच एका जेत्याची कहाणी प्रेक्षकांना 'जेता' या आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. नुकतंच या चित्रपटातील 'धाव मर्दा धाव...' हे प्रेरणादायी गाणं रिलीज करण्यात आलं आहे.

नवी उमेद जगावणारे गाणे - निर्माते संजय लक्ष्मणराव यादव यांनी सहनिर्माते मिहीर संजय यादव आणि सुप्रसिद्ध हॉटेल आराम रिजन्सीचे मालक रोहन विजय यादव यांच्या साथीने संजू एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली 'जेता'ची निर्मिती केली असून दिग्दर्शक योगेश साहेबराव महाजन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटातील 'धाव मर्दा धाव...' या गाण्याचे अनावरण खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या शुभहस्ते करण्यात आले. जीवनात यश अपयश येत असते. या अपयशावर मात देण्यासाठी प्रेरणा मिळणे खूप गरजेचे असते. ही प्रेरणा अख्ख्या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराजांच्या रुपात मिळत असते. छत्रपतींची हीच प्रेरणा 'धाव मर्दा धाव...' या गाण्याच्या निमित्ताने रसिकांना अनुभवायला मिळणार आहे. 'धाव मर्दा धाव...' हे गाणं खऱ्या अर्थानं नवी उमेद जागवणारं असून, विजयासाठी संघर्ष करण्यासाठी प्रोत्साहित करणारे आहे, असे यावेळी खासदार छत्रपती उदयनराजे भोसले म्हणाले.

25 नोव्हेंबर पासून जेता संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित - संजय लक्ष्मणराव यादव यांनी चित्रपटाची कथा लिहिली आहे. संजय लक्ष्मणराव यादव यांनीच योगेश सबनीस आणि योगेश साहेबराव महाजन यांच्या साथीने पटकथाही लिहीली आहे. याशिवाय येगेश सबनीस यांच्यासोबत संजय लक्ष्मणराव यादव यांनी 'जेता'साठी संवादलेखनही केले आहे. या चित्रपटामध्ये नीतिश चव्हाण, स्नेहल देशमुख, शरद गोयेकर, अनिकेत केळकर, प्रज्ञा सोनावणे-डावरे, कुणाल मेश्राम आदी कलाकारांनी विविध व्यक्तिरेखा साकारल्या आहे. सिनेमॅटोग्राफी अनिकेत के. यांनी केली असून, संकलन हर्षद वैती यांनी केले आहे.

जगदीश चव्हाण यांचा या गाण्याला स्वर - 'जेता' चित्रपटाचे निर्माते संजय लक्ष्मणराव यादव व सहनिर्माते रोहन विजय यादव आणि मिहीर संजय यादव यांच्यासह सातारा विभागातील युवा उद्योजक प्रसन्न आवाडे उपस्थित होते. योगेश साहेबराव महाजन लिखित 'धाव मर्दा धाव...' हे गाणं संगीतकार कबीर शाक्य यांनी संगीतबद्ध केले आहे. 'मराठी इंडियन आयडॉल'मध्ये फर्स्ट रनर-अप राहिलेला जगदीश चव्हाण याचा स्वर या गाण्याला लाभला आहे. अर्थपूर्ण शब्दरचा, लयबद्ध संगीत आणि सुरेल आवाज हे समीकरण जुळल्यानं 'धाव मर्दा धाव...' हे गाणं रसिकांच्या पसंतीस उतरणार असल्याची भावना, संजय लक्ष्मणराव यादव यांनी व्यक्त केली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details