मुंबई - कोरोनाच्या संकटातही मुंबई महापालिकेच्या जल विभागाचे कर्मचारी चांगली कामगिरी करताना दिसत आहेत. मुंबईकरांसाठी पाणीपुरवठा सुरळीत रहावा, यासाठी ते 24 तास सात दिवस काम करीत आहेत.
जल विभागाच्या 16 अभियंते आणि 30 ते 35 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. मात्र, त्यावर त्यांनी यशस्वी मात केली. यानंतर भर उन्हाळ्यात मुंबईचा पाणी पुरवठाही सुरळीत ठेवला. हॉटस्पॉट परिसरातही काम केले आहे. 23 मार्चला वरळीला मेट्रोच्या कामामुळे वरळी नाका येथे 57 व्यासाच्या मुख्य जलवाहिनीला गळती सुरु होती. ती तातडीने दुरूस्त केली. दुसरे काम लोअर परेल रेल्वे स्टेशन पुलाजवळची पाईपलाईन फुटली होती. ती ही तातडीने दुरुस्त केली.