मुंबई -तौक्ते चक्रीवादळ महाराष्ट्राच्या पश्चिम किनारपट्टीला समांतर हळूहळू गुजरातच्या दिशेने सरकू लागला आहे. चक्रीवादळ मुंबईपासून साधारण 400 किलोमीटर दूर आहे. मुंबईमध्ये सध्या वाऱ्याचा वेग ताशी तेवीस किलोमीटर इतका आहे. हाच वाऱ्याचा वेग मध्यरात्रीच्या सुमारास ऐंशी किलोमीटर प्रति तास इतका होणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.
माहिती देताना 'ईटीव्ही भारत' प्रतिनिधी हेही वाचा -कॅन्सरग्रस्तांसाठी 'म्हाडा’च्या १०० घरांच्या चाव्याशरद पवारांच्या हस्ते टाटा रुग्णालयाला
पालिकेच्या आपत्ती व्यवस्थापनाचे संपूर्ण पथक या वादळावर लक्ष ठेवून आहे. मुंबईच्या सहा चौपाट्यांवर बावीस सीसीटीव्हींच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे, तर संपूर्ण मुंबईवर जवळपास पाच हजार सीसीटीव्हींच्या माध्यमातून नजर ठेवली जात आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून आढावा घेतला 'ईटीव्ही भारत'च्या प्रतिनिधीने.
हेही वाचा -ईटीव्ही भारत विशेष: देशात रेल्वे हद्दीतील घडलेल्या गुन्ह्यांमध्ये महाराष्ट्र अव्वल