मुंबई -अंधेरी येथील मेट्रोपॉलिटन दंडाधिकारी न्यायालयाने अभिनेत्री कंगना रणौत यांच्याविरूद्ध खटला चालविण्यासाठी फिर्यादींना आधी केंद्र सरकार किंवा राज्य सरकारची परवानगी घेण्याची आदेश दिले आहेत.
अभिनेत्रीच्या सोशल मीडिया पोस्टवरून वकील काशिफ खान देशमुख यांनी गेल्या वर्षी अंधेरी न्यायालयात विनंती केली होती. त्यांनी न्यायालयाला "issuance of process" करण्याची मागणी केली होती, म्हणजेच न्यायालयाने रणौत यांना बोलावून त्यांच्याविरुद्ध खटला सुरू करावा, असे त्यात सांगणे होते.
हेही वाचा -"माझा छळ का होतोय? मला देशाकडून उत्तर हवंय", कंगनाचे जनतेला आवाहन
हा खटला भारतीय दंड संहिता (आयपीसी) च्या विविध कलमांतर्गत आहे, ज्यात 121, 121A, 124 A, 153 A, 153 B, 295 A , 298 and आणि 505 आहेत. या प्रकरणात देशमुख 124 A (देशद्रोह) अंतर्गत खटला चालविण्यासाठी न्यायालयाने केंद्र किंवा राज्य शासनाची परवानगी घ्यायला सांगितले आहे.