महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Metro Megablock : डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान मेट्रो सेवा आज राहणार बंद - मेट्रो मार्ग २ अ आणि ७

डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान मेट्रो सेवा उद्या रविवार (दि. ८ जानेवारी)रोजी बंद राहणार (Metro services between Dahanukarwadi and Aarey) आहे. सिग्नल यंत्रणेच्या कामांमुळे मेट्रो 2 आणि मेट्रो मार्गिका 7 सेवा बंद राहणार (Mumbai Metro Closed Today) आहे. उद्या सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत दोन्ही बाजूकडील मेट्रो सेवा बंद राहणार आहे. (Metro Megablock) एकात्मिक सिग्नलींग प्रणालीच्या चाचणीसाठी मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर मेगाब्लॉक आहे.

Mumbai Metro services
मेट्रो सेवा मुंबई

By

Published : Jan 7, 2023, 12:57 PM IST

Updated : Jan 8, 2023, 7:01 AM IST

मुंबई :एकात्मिक सिग्नल यंत्रणा दुरुस्ती तसेच चाचणी अनुषंगाने उद्या सकाळी ०६ वाजल्यापासून रात्री १० वाजेपर्यंत दोन्ही मार्गावरमेगाब्लॉकघेण्यात येणार (Mumbai Metro Closed Today) आहे. या काळात मेट्रो मार्ग २ अ आणि ७ च्या डहाणूकरवाडी ते आरे दरम्यान पहिल्या टप्प्यात सुरू असलेली मेट्रो सेवा प्रवाशांसाठी उपलब्ध (Metro services between Dahanukarwadi and Aarey) नसेल.




सेवा बंद करणे आवश्यक : मेट्रो मार्ग २ अ आणि ७ पूर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यासाठी फेज १ आणि २ या दोन्ही मार्गिकांमध्ये एकात्मिक सिग्नलिंग प्रणाली कार्यान्वित करणे गरजेचे आहे. या प्रणालीची अंमलबजावणी आणि चाचणी करण्यासाठी सध्या कार्यान्वित असलेल्या पहिल्या टप्प्यांतील सेवा बंद करणे आवश्यक आहे. त्यामुळेच या मार्गावरील सिग्नल यंत्रणा ही एकात्मिक पद्धतीने करण्यासाठी ही सेवा दोन्ही बाजूंना आज तात्पुरत्या स्वरूपात बंद राहणार (Metro services remain closed on January 8 ) आहे.


मेगाब्लॉक दरम्यान कामाचे स्वरूप : पब्लिक अनाऊंसमेंट सिस्टीम, पॅसेंजर इन्फॉर्मेशन डिस्प्ले सिस्टीम, सिग्नलिंग आणि टेलिकॉम सिस्टीमसह रोलिंग स्टॉक यांसारख्या सिस्टीमची एकात्मिक चाचणी करणे. ही चाचणी करताना अनेक प्रकारच्या इलेक्ट्रॉनिक आणि तांत्रिक काम करताना अचूकता त्यामध्ये असली पाहिजे आणि त्याकरिता मेट्रो सेवा बंद ठेवावी लागत (Mumbai Metro services) आहे.

मेट्रो सेवा कामानंतर पूर्ववत :दुसऱ्या टप्प्यात चाचणी होत असलेल्या तसेच वापरण्यात येणाऱ्या अद्ययावत प्रणालीसोबत पहिल्या टप्पा संरेखित करणे, यामध्ये ज्या प्रणाली अस्तित्वात आहे. त्या प्रणाली नीटपणे चालत आहेत की नाही, तसेच त्यामध्ये कोणता बदल करणे जरुरी आहे, अथवा त्यात काही नवीन सुधारणा करणे जरुरी आहे हे देखील पाहिले जाईल. जेणेकरून मेट्रो सेवा ही दुरुस्तीच्या कामानंतर पूर्ववत सुरू (Metro services remain closed) राहील.

महत्त्वाच्या बाबी :प्रवाशांच्या सुखकर प्रवासासाठी संपूर्ण प्रणालीची अखंडता आणि सुरक्षितता तपासणे. प्रवाशांच्या सुरक्षितते संदर्भात महत्त्वाच्या बाबी तपासणे अत्यावश्यक आहे. मुंबईसारख्या महानगरामध्ये पुढील होणाऱ्या दुर्घटना टाळता याव्या. ते टाळण्यासाठी काय काय करायला हवे आणि प्रवाशांना वेळीच सावध कसे करता येईल, इत्यादी महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील या ठिकाणी कामे केली जाणार (Metro services) आहे.

मेट्रोचा दुसरा टप्पा :प्रकल्पाची संपूर्ण स्थापत्य तसेच प्रणालीची कामे पूर्ण झाली आहेत. लवकरच मेट्रो २ अ आणि ७ चा दुसरा टप्पा मुंबईकरांच्या सेवेत दाखल होईल. ही मार्गिका पादचारी पुलाद्वारे मेट्रो मार्ग १ सोबत जोडली गेल्यामुळे रस्त्यावरील रहदारी कमी होईल, अशी माहिती एमएमआरडीएचे महानगर आयुक्त श्री. एस. व्ही. आर. श्रीनिवास यांनी (Mumbai Metro) दिली.

Last Updated : Jan 8, 2023, 7:01 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details