मुंबई: बेस्टच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू असतानाच रेल्वेकडून तीन मार्गांवर मेगाब्लॉक घेतला जात आहे. हा मेगाब्लॉक दुपारी चार वाजेपर्यंत असणार आहे. मध्य रेल्वे मुंबई विभागाने विविध अभियांत्रिकी आणि देखभालीच्या कामासाठी मेगाब्लॉक केला आहे. मध्य रेल्वेच्या उपनगरीय स्थानकावर मेगाब्लॉक असणार आहे.
कसा असेल मेगाब्लॉक: माटुंगा-ठाणे अप आणि डीएन स्लो लाईन्स सकाळी 8.30 ते दुपारी 1.30 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 07.42 ते दुपारी 1.02 वाजेपर्यंत सुटणाऱ्या धीम्या मार्गावरील गाड्या माटुंगा आणि ठाणे स्थानकांदरम्यान जलद मार्गावर वळवण्यात येतील. तर ठाणे स्थानकावरुन या गाड्या धिम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. नियोजित आगमनापेक्षा या गाड्या 15 मिनिटांनी गंतव्य स्थानावर पोहोचतील. सायन, कुर्ला, घाटकोपर, विक्रोळी, भांडुप, मुलुंड आणि ठाणे स्थानकांवर लोकल रेल्वे थांबतील.
या मार्गावर असेल ब्लॉक: सकाळी 07.47 ते दुपारी 12.37 पर्यंत कल्याणहून सुटणाऱ्या अप धिम्या मार्गावरील गाड्या ठाणे ते माटुंगा दरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील. माटुंगापासून या गाड्या अप धीम्या मार्गावर पुन्हा वळवण्यात येतील. परंतु नियोजित आगमनापेक्षा या गाड्या 15 मिनिटे उशिराने पोहोचतील. या गाड्या ठाणे, मुलुंड, भांडुप, विक्रोळी, घाटकोपर, कुर्ला आणि सायन स्थानकावर थांबतील. कुर्ला-वाशी अप आणि डीएन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत ब्लॉक असेल. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल पर्यंतचा मार्ग सकाळी साडे दहा ते दुपारी साडेतीन वाजेपर्यंत बंद असेल. या वेळेत एकही लोकल रेल्वे धावणार नाही. त्याचबरोबर सकाळी 10. 16 ते दुपारी 3.47 मिनीटांपर्यंत पनवेल ते सीएसएमटी पर्यंत अप हार्बर मार्गावर रेल्वे धावणार नाही.