महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Measles Update : मुंबईत पाच वेळा गोवरच्या शून्य रुग्णांची नोंद; १ रुग्ण व्हेंटिलेटरवर

मुंबईमध्ये ऑक्टोबरपासून गोवरच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत (Increase in the number of measles patients) होती. मुंबईत सर्वत्र गोवरचा प्रसार (spread of measles in Mumbai) झाला होता. मात्र गेल्या काही दिवसात गोवरचा प्रसार आटोक्यात आल्याने आतापर्यंत पाच वेळा शून्य रुग्णांची नोंद (Zero cases of measles reported) झाली आहे. विशेष म्हणजे लागोपाठ गेले दोन दिवस शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत निश्चित निदान झालेल्या एकूण ५६३ रुग्णांची तर ५५०१ संशयित रुग्णांची नोंद झाली आहे. गोवरमुळे १९ बालकांचा मृत्यू (death of a child due to measles) झाला आहे. त्यापैकी १६ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबई बाहेरील आहे. (Mumbai Measles Update)

Mumbai Measles Update
मुंबई गोवर अपडेट

By

Published : Jan 8, 2023, 7:58 PM IST

मुंबई :मुंबईत १ कोटी १७ लाख २६ हजार ९७० घरांचा सर्व्हे करण्यात आला आहे. त्यात ताप आणि लाल पुरळ असलेले ५५०१ संशयित रुग्ण आढळून आले आहेत. (Increase in the number of measles patients) जानेवारी २०२२ पासून आतापर्यंत गोवरचे निश्चित निदान झालेले ५६३ रुग्ण आढळून आले आहेत. गोवर रुग्णांवर उपचार करण्यासाठी विविध रुग्णालयात ३३८ बेडस उपलब्ध करून देण्यात आले आहेत. (spread of measles in Mumbai) त्यापैकी ७७ बेडवर रुग्ण असून इतर बेड रिक्त आहेत. (Zero cases of measles reported) १७३ जनरल बेडपैकी ६७, १२९ ऑक्सीजन बेड पैकी ४, ३६ आयसीयु बेडपैकी ६ बेडवर रुग्ण आहेत. (death of a child due to measles) २० व्हेंटिलेटर असून त्यापैकी १ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. (Mumbai Measles Update)

५ वेळा शून्य रुग्णांची नोंद :मुंबईत सप्टेंबर ऑक्टोबर पासून गोवर रुग्णांची संख्या वाढली आहे. रोज निश्चित निदान झालेले तसेच ताप आणि पुरळ असलेल्या रुग्णांची नोंद होत आहे. गोवरचा प्रसार काही प्रमाणात आटोक्यात आल्याने १३ डिसेंबर, १८ डिसेंबर आणि त्यानंतर आज ३१ डिसेंबर २०२२ रोजी शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. या वर्षी ६ आणि ७ जानेवारी रोजी पुन्हा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे. आतापर्यंत एकूण ५ वेळा शून्य रुग्णांची नोंद झाली आहे.


गोवरमुळे १९ मृत्यू :मुंबईमधील रुग्णालयात आतापर्यंत एकूण १९ मृत्यू झाले आहेत. त्यापैकी १६ मृत्यू मुंबईतील तर ३ मृत्यू मुंबईबाहेरील आहे. मुंबईमधील एकूण १६ मृत्यूपैकी ८ जणांचा मृत्यू गोवारमुळे झाला आहे. ८ जणांचा मृत्यू संशयित म्हणून नोंद झाला आहे. डेथ ऑडिट कमिटीची बैठक आयोजित केली जाणार आहे. या बैठकीत संशयित मृत्यूबाबत अहवाल येईल त्यामधून मृत्यूचे नेमके कारण समोर येणार आहे.


या उपाययोजना :गोवर रुग्ण शोधण्यासाठी घराघरात जाऊन भेटी दिल्या जात आहेत. दैनंदिन सर्व्हेक्षण करून ॲटिव्ह रुग्ण शोधून काढत आहोत. संशयित रुग्णांना व्हिटॅमिन "अ" दिले जात आहे. यामुळे मुलांमध्ये रोग प्रतिकारशक्ती वाढते तसेच मृत्यूचे प्रमाण रोखणे शक्य होते. लसीकरण झाले नाही, वजन कमी, दाटीवाटीने राहणारे लोक, एकाच घरात जास्त संख्येने मुलं असणे, रक्तक्षय, अँनिमिया यामुळे मृत्यू वाढू शकतात. यासाठी व्हिटॅमिन "अ" देणे, लक्षणे दिसल्यास रुग्णालय भरती करणे, त्यांच्यावर ताबडतोब उपचार करणे या उपाययोजना केल्या तर मृत्यूचे प्रमाण रोखता येवू शकते. मुलांना वेळेवर लसीकरण करणे हे सुध्दा महत्वाचे आहे. विविध रुग्णालयात ३०० हून अधिक बेडस तयार आहेत. त्यापैकी बहुतेक बेड रिक्त आहेत. आयसीयु आणि व्हेंटिलेटर तयार आहेत अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाच्या मुख्य कार्यकारी आरोग्य अधिकारी डॉ. मंगला गोमारे यांनी दिली.

ABOUT THE AUTHOR

...view details