महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कंगनाच्या मेंदूला गंज आलाय, तिला मनोरुग्णालयात भरती करा; वादग्रस्त वक्तव्यावरुन किशोरी पेडणेकरांचा निशाणा - kangna ranaut controversial statement

मुंबईच्या महापौर किशोर पेडणेकर यांनी अभिनेत्री कंगना रणौतवर टीका केली. कंगनाने केलेल्या वादग्रस्त विधानामुळे त्यांनी तिला अटक करण्याची मागणीदेखील केली. कंगना रणौत ही बनावट झाशीची राणी असून ती नेहमीच देशाची, महाराष्ट्र आणि मुंबईची मान आणि शान घालवते. यामुळे तिच्यावर कारवाई केली पाहिजे, असे त्या म्हणाल्या.

kishori pednekar
किशोरी पेडणेकर

By

Published : Nov 13, 2021, 4:02 PM IST

Updated : Nov 13, 2021, 4:12 PM IST

मुंबई - कंगना रणौत ही बनावट झाशीची राणी असून ती नेहमीच देशाची, महाराष्ट्र आणि मुंबईची मान आणि शान घालवते. यामुळे तिच्यावर कारवाई केली पाहिजे. कंगणाच्या मेंदूला गंज आला आहे. तिला मेंटल कारागृहमध्ये टाका, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar on Kangna Ranaut) यांनी केली.

माध्यमांशी बोलताना मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर

कंगनाचे पुन्हा वादग्रस्त वक्तव्य -

अभिनेत्री कंगना रणौत आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे नेहमीच चर्चेत असते. देशाला खरे स्वातंत्र्य 2014मध्ये मिळाल्याचे वक्तव्य कंगनाने केले आहे. यानंतर कंगनाला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार परत घ्यावा, अशी मागणी केली जात आहे. तिच्याविरोधात कारवाई करण्याची मागणी ठिकठिकाणी करण्यात येत असून सर्वत्र याचे पडसाद उमटत आहेत. या पार्श्वभूमीवर बोलताना कंगनाच्या मेंदूला गंज आला. तिला मेंटल कारागृहमध्ये टाका, अशी मागणी महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar criticize Kangna Ranaut) यांनी केली.

बनावट झाशीची राणी -

कंगना रणौत ही नटवी नटी आहे. तिच्यावर कोणतेही संस्कार दिसत नाहीत. प्लास्टिकच्या घोड्यावर बसून कोणी झाशीची राणी होत नाही. ही बनावट झाशीची राणी आहे. एक झाशीची राणी चित्रपट केला म्हणून पूर्ण भारत कळाला, असे होत नाही. भारताला, महाराष्ट्राला आणि मुंबईला इतक्या सहज स्वातंत्र्य मिळाले नाही. अनेक जाती, पंथांच्या लोकांनी आपल्या प्राणाची आहुती दिली आहे. 107 हुतात्मे मुंबईने दिले आहेत. त्यानंतर स्वातंत्र्य मिळाले आहे, असे महापौर पेडणेकर म्हणाल्या.

हेही वाचा -कंगनाबेनचा द्रोह! सामनाच्या अग्रलेखातून कंगनावर टीका

कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे -

कंगनाने आपण ड्रग अॅडिक्ट असल्याचे स्वत: कबूल केले आहे. अशा ड्रग अॅडिक्टकडून आपण काय अपेक्षा ठेवायची. तिच्या मेंदूला गंज आला आहे. त्यामुळे ती काहीही बरळत असते. तिला काही पक्ष पाठीशी घालतात. ती नेहमीच देशाची, महाराष्ट्र आणि मुंबईची मान आणि शान घालवते. यामुळे तिच्यावर कारवाई केली पाहिजे. तिला मेंटल कारागृहामध्ये टाकले पाहिजे, अशी मागणी महापौरांनी केली. कंगना आम्हाला स्वातंत्र्यवीरांबद्दल काय शिकवणार? हे सर्व घृणास्पद आहे. तिच्यावर कायद्यानुसार कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी महापौरांनी केली. (Kishori Pednekar to arrest Kangna Ranaut)

Last Updated : Nov 13, 2021, 4:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details