महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या स्पर्धकांकडून सामाजिक संदेश - mumbai tata marathon cm uddhav thackeray

मुंबई मॅरेथॉनमध्ये जवळपास ५५,३२२ धावपटू सहभागी झाले आहेत. ४२.१९५ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ९,६६० धावपटू सहभागी झाले आहेत.

mumbai-marathon-participants-give-social-message-to-society
मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या स्पर्धांकडून सामाजिक संदेश

By

Published : Jan 19, 2020, 8:49 AM IST

Updated : Jan 19, 2020, 11:10 AM IST

मुंबई -मुंबईमध्ये आज (रविवारी) सर्वात मोठी टाटा मुंबई मॅरेथॉन होत आहे. या मॅरेथॉनमध्ये लहान मुलांपासून वयोवृद्ध नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झालेले आहेत. प्रत्येक जण काही ना काही सामाजिक संदेश देत या मॅरेथॉनमध्ये सहभाग नोंदवत आहे. टाटा मॅरेथॉनमध्ये सहभागी झालेल्या स्पर्धकांशी आमच्या प्रतिनिधीने बातचीत केली आहे.

मुंबई मॅरेथॉनमध्ये धावणाऱ्या स्पर्धांकडून सामाजिक संदेश

मुंबई मॅरेथॉनसाठी देश-विदेशातील अव्वल धावपटूंनी स्पर्धेत भाग घेतला आहे. मुंबई मॅरेथॉनमध्ये जवळपास ५५,३२२ धावपटू सहभागी झाले आहेत. ४२.१९५ किमीच्या पूर्ण मॅरेथॉनमध्ये ९,६६० धावपटू, २१ किमीच्या हाफ मॅरेथॉनमध्ये १५,२६० तर हौशी धावपटूंसाठी असलेल्या ‘ड्रीम रन’मध्ये १९,७०७ स्पर्धक, १० किमी शर्यतीत ८,०३२, वरिष्ठांच्या मॅरेथॉनमध्ये १,०२२ आणि अपंगांच्या शर्यतीत १,५९६ धावपटू सहभागी होणार आहेत.

Last Updated : Jan 19, 2020, 11:10 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details