मुंबई :बॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता आणि विनोदी कलाकार तसेच निर्माता सतीश कौशिक याच्या पत्नीने मुंबईच्या न्यायदंडाधिकारी यांच्याकडे तक्रार केलेली आहे. एका महिलेने असा आरोप केला होता की, 'सतीश कौशिक यांची हत्या केलेली आहे.' त्यामुळे पत्नी शशीच्या तक्रारीच्या आधारे आता मुंबई न्यायदंडाधिकारी न्यायालयाने संबंधित महिलेला आता समन्स बजावलेले आहे, त्याची सुनावणी 15 जून रोजी निश्चित केलेली आहे.
बदनामीकारक गुन्हा :बॉलीवूड अभिनेता सतीश कौशिक यांचा मृत्यू झाल्यानंतर सानवी मालू नावाच्या महिलेकडून कथितपणे प्रसार माध्यमांसमोर तिने दावा केला की, सानवी मालुचा पती विकास मालू याने मित्र सतीश कौशिक यांच्याकडून रोख रक्कम घेतली होती. विकास मालू याला सतीश कौशिक याने ती रक्कम परत केली नव्हती. त्यामुळे त्यांच्यात जोरदार वादविवाद झाला आणि नंतर खून झाला. या पद्धतीने प्रसारमाध्यमांमध्ये सानवी मालू व राजेंद्र चब्बर या दोन आरोपींनी जे काही कथित विधान केलेले आहे. त्यांच्याबाबत प्राप्त झालेल्या तक्रारीमधून आणि त्याबाबत दस्तावेज आणि पुरावे तसे रेकॉर्डवरील कागदपत्र परीक्षण केले असता हा भारतीय दंडविधान संहितेच्या तरतुदींचा भंग होतो, असे दिसते. प्रथमदर्शनी बदनामीकारक गुन्हा यांच्यावर लागू होऊ शकतो, असे देखील न्यायदंडाधिकारी यांनी म्हटलेले आहे.
सतीश कौशिक यांचा खून झाल्याचा आरोप :सानवी मालू आणि राजेंद्र चबर या दोघांनी प्रसार माध्यमांसमोर ज्या रितीने सतीश कौशिक यांचा खून झाल्याचा आरोप केलेला आहे, त्यानंतर अभिनेता सतीश कौशिकी यांची पत्नी शशी हिने या दोघांबद्दलची बदनामी केली अशी तक्रार केलेली आहे. त्यामध्ये म्हटलेले आहे की, समाजामध्ये स्वतःची एक वेगळी प्रतिमा निर्माण करण्यासाठी यांनी हा कट रचला. आणि त्यामुळे त्यांनी बदनामी केलेली आहे. म्हणून त्यांच्यावर संबंधित कायद्याअंतर्गत गुन्हे नोंदवा.
सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकारामुळे :माझा नवरा हा 'सतीश कौशिक हा गँगस्टर दाऊद इब्राहिम आणि त्याच्या टोळीशी संबंधित होता, असे सानवी मालू आणि राजेंद्र चब्बर यांनी प्रसारमाध्यमासमोर म्हटले. त्यामुळेच ही बदनामी होते. म्हणूनच त्या संदर्भात त्यांच्यावर खटला चालवावा, असे देखील याचीकेमध्ये सतीश कौशिक याची पत्नी शशी यांनी म्हटलेले आहे. त्यांनी हे देखील नमूद केलेले आहे की, दिल्लीमधील जेव्हा सतीश कौशिक यांना दीनदयाळ उपाध्याय रुग्णालयात दाखल केले होते. तेथील कर्तव्यावर असणाऱ्या या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जो अहवाल दिला आहे, त्यामध्ये सतीश कौशिक यांचा मृत्यू हृदयविकारामुळे झाला असे स्पष्ट आहे. असे असताना माझ्या पतीबाबत तो दाऊदच्या टोळीशी संबंधित होता. त्याचा भांडणामुळे खून झाला, या पद्धतीची बनावट कहाणी माध्यमांसमोर सांगितली. खोटी बनावट प्रसिद्ध केली. म्हणून याबाबत बदनामी खटला चालवावा, असे याचिकेत म्हटले आहे.
हेही वाचा :
- Amrita Fadnavis Bribary News : अमृता फडणवीस यांना धमकी आणि लाच प्रकरणी न्यायालयात आरोपपत्र दाखल
- Cordilea Cruise drug cases : समीर वानखेडेकडून मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल, आज दुपारी होणार सुनावणी
- Kota Online Fraud Case : मुंबईत बनावट फर्म करून शेअर मार्केटच्या नावाने फसवणूक; पोलिसांनी पाच आरोपीच्या आवळल्या मुसक्या