मुंबई - मुंबई शहर आणि उपनगरात सलग चार दिवस पावसाचा जोर कायम होता. मंगळवारच्या पावसामुळे उपनगरीय रेल्वे ठप्प होती. यानंतर आज सकाळपासूनच मध्य रेल्वेची लोकल सेवा 20 मिनिटे उशिराने सुरू आहे. परिणामी सीएसएमटीकडे जाणाऱ्या गाड्या उशिराने धावत आहेत. यामुळे सर्वच रेल्वेस्थानकांवर गर्दी दिसून येत आहे.
पावसाच्या जोरदार बॅटिंगमुळे मंगळवारी मध्य रेल्वे मार्गावर पाणी साचले होते. त्यामुळेच बुधवारी मध्य रेल्वेच्या वेळापत्रकामध्ये आज बदल करण्यात आला आहे. जोरदार पावसाची श्यक्यता असल्याने आज रविवारच्या वेळापत्रकानुसारच मध्य रेल्वेची वाहतूक चालवण्यात येणार आहे, अशी माहिती अधिकृतपणे देण्यात आली आहे.
मुंबई : लोकल उशिराने धावत असल्याने रेल्वे स्थानकांत प्रवासी खोळंबले चाकरमानी गेली 5 दिवस कामावर कमी जास्त प्रमाणात हजर होते. एवढेच नाही, तर मंगळवारी सार्वजनिक सुट्टीदेखील देण्यात आली होती. रात्रीपासून पावसाचा जोर कमी झाला असल्याने आज वातावरण ढगाळ असले तरी चाकरमानी कामावर जाण्यासाठी रेल्वे स्थानक गाठत आहे. मात्र, रेल्वेच्या सेवा कमी असल्याने विक्रोळी रेल्वे स्थानक परिसरात ठाणेच्या दिशेला व सीएसटीएमच्या दिशेने लोकल कमी असल्याने सकाळपासूनच प्रवाशांनी मोठी गर्दी केल्याचे दिसत आहे.
सलग चार दिवसांपासून कोसळणाऱ्या पावसाने मध्य आणि हार्बर रेल्वे मार्ग पूर्णपणे ठप्प झाला होता. काल सायंकाळी 4.30 वाजता उपनगरी लोकलसेवा सुरू केल्याने तब्बल 16 तासांनी प्रवाशांना दिलासा मिळाला. तसेच काही विशेष रेल्वे सोडून मध्य रेल्वेने प्रवाशांना दिलासा दिला होता.