मुंबई : मुंबईत चर्चगेट येथून बोरिवलीला जाणाऱ्या ट्रेनच्या मोटरमनला चक्कर आली. ही ट्रेन मालाड स्टेशन येथे आली असताना हा प्रकार घडला. त्वरित त्या मोटरमनची डॉक्टरांनी तपासणी केली. त्याची प्रकृती स्थिर झाल्यावर ती लोकल ट्रेन पुढील प्रवासासाठी पाठवण्यात आली. ट्रेन वेगात असताना चक्कर आली असती तर हजारो प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाला असता असे मोटरमन म्हणला.
मोटरमन चक्कर येवून पडला :मिळालेल्या माहितीनुसार, चर्चगेट येथून बोरिवली येथे जाणारी ९०५३९ ही ट्रेन काल मंगळवारी दुपारी १४.३० वाजता सुटली. ही ट्रेन मालाड रेल्वे स्थानकात दुपारी १५.२७ वाजता पोहचली. ही ट्रेन मनीष कुमार हे मोटरमन चालवत होते. मालाड स्टेशनवर ट्रेन आली असता मनीष कुमार हे चक्कर येवून पडले. याची माहिती त्वरित स्टेशन मास्टर यांना देण्यात आली. स्टेशन मास्टर डॉक्टरांना घेवून तातडीने ट्रेन जवळ आले. डॉक्टरांनी मोटर मनिष कुमार यांची तपासणी केली असता त्यांचा ब्लड प्रेशर लो झाल्याचे समजले. डॉक्टरांनी तातडीने त्यांच्यावर उपचार केले. मनिष कुमार यांची प्रकृती स्थिर झाल्यावर आणखी एका मोटरमनला सोबतीला देवून ट्रेन बोरिवलीच्या दिशेने पाठवण्यात आली.