मुंबई Mumbai Local Train :मध्य रेल्वेच्या वांगणी ते बदलापूर या रेल्वेस्थानका दरम्यान सकाळी 8:15 वाजेच्या सुमारास तांत्रिक बिघाड झाला. ओव्हरहेड वायर खराब झाल्यामुळं येणाऱ्या जाणाऱ्या रेल्वे सेवा तात्पुरत्या थांबल्या आहेत. अप लाईन सेक्शनमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या दिशेनं हा बिघाड झाल्यानं एक्स्प्रेस मेल एका मागे एक उभ्या राहिल्या आहेत. दरम्यान, यामुळं सर्व एक्सप्रेस गाड्या पनवेल मार्गाने वळवण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केलं आहे.
मेगा ब्लॉक नसतानाही तांत्रिक बिघाडामुळे ठरला मेगाब्लॉक : आज खरं तर मेगाब्लॉक घेण्यात आला नव्हता. परंतु वांगणी आणि बदलापूर रेल्वे स्थानकाच्या दरम्यान ओव्हर हेड वायरमध्ये तांत्रिक बिघाड झाला. सकाळी सव्वा आठच्या सुमारास हा तांत्रिक बिघाड झाल्यानंतर जाणाऱ्या आणि येणाऱ्या बाजूच्या मेल एक्सप्रेस आणि लोकल रेल्वे गाड्या आहेत. त्या ठिकाणीच थांबायला लागल्या आहेत.
मेल एक्सप्रेस गाड्या आता व्हाया पनवेल दिशेनं धावणार :छत्रपती शिवाजी टर्मिनसकडे म्हणजेच अप लाईनवर बिघाड झाल्यामुळं रेल्वे प्रशासनानं डाऊनलाईन वापरून गाड्यांचे नियोजन केलं. त्यामुळं आता मेल एक्सप्रेस गाड्या व्हाया पनवेल मार्गानं-त्या ठिकाणी जाण्याचं नियोजन रेल्वे प्रशासनानं केले. त्यामुळेच मेल एक्सप्रेस गाड्यांच्या वेळापत्रकातदेखील आता काहीसा बदल होणार आहे. अर्धा तास ते एक तास उशिरा नामेल एक्सप्रेस धावतील, अशी शक्यता रेल्वे प्रवासी संघटना अमोल पाटील यांनी व्यक्त केली.