महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Local Mega Block : मुंबईकरांनो रविवारी घराबाहेर पडताय, 'या' मार्गांवर लोकलचा मेगाब्लॉक - लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द

Mumbai Local Mega Block : रेल्वे मार्गांच्या देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज मध्य रेल्वेनं लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक घोषित केलायं. यामुळे मुंबई लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे रविवारी प्रवाशांनी वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचं नियोजन करण्याचं आवाहन रेल्वे प्रशासनाने केलय.

मुंबई लोकलच्या अनेक फेऱ्या रद्द
Mumbai Local Mega Block

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 9, 2023, 9:29 PM IST

Updated : Sep 10, 2023, 9:17 AM IST

मुंबई Mumbai Local Mega Block : मुंबईतील तिन्ही उपनगरीय रेल्वे मार्गांवर देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी आज रेल्वेनं मेगाब्लॉक घोषित केलाय. त्यामुळं अनेक जलद आणि धीम्या लोकलच्या फेऱ्या रद्द करण्यात आल्याची माहिती मध्य रेल्वनं दिली. तांत्रिक देखभाल दुरुस्तीची कामे रविवारी केली जाणार असल्याने प्रवाशांनी मेगाब्लॉकबाबत वेळापत्रक पाहूनच आपल्या प्रवासाची दिशा निश्चित करण्याचं आवाहन मध्य रेल्वेनं केलंय.




पश्चिम रेल्वेवर मेगाब्लॉक : पश्चिम उपनगरीय रेल्वे मार्गावर चर्चगेट ते मुंबई सेंट्रल या दरम्यान मेगाब्लॉक करण्यात येणार आहे. हा मेगाब्लॉक अप आणि डाऊन म्हणजे चर्चगेट पासून विरारकडे आणि विरारपासून चर्चगेटकडे दोन्ही मार्गावर सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यामुळे अनेक लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या असून काही लोकल उशिराने धावणार आहेत. (Mumbai Local Mega Block)



मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक : मध्य रेल्वेवरील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते विद्याविहार उपनगरीय रेल्वे मार्गावर सकाळी पावणेअकरा ते दुपारी पावणेचार पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. या दरम्यानच्या काळात या मार्गावरील धीम्या व जलद लोकल फेऱ्या कमी होणार आहेत.



हार्बर रेल्वेवर कुठे मेगाब्लॉक :हार्बर रेल्वे मार्गावर पनवेल पासून ते वाशी पर्यंत सकाळी अकरा ते सायंकाळी चार वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. यात अप आणि डाऊन दोन्ही मार्गावरील धीम्या लोकल फेऱ्या कमी करण्यात येणार आहेत. छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून ते पनवेल, बेलापूर ते ठाणे व पनवेल आणि ठाणे ते नेरूळ अशा अप आणि डाऊन लोकल फेऱ्या या काळात रद्द होणार आहेत. मात्र नेरूळ ते घाटकोपर व बेलापूर ते घाटकोपर या मार्गांवर धावणाऱ्या लोकल वेळापत्रकानुसार धावणार असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिलीयं. (mega block on Harbour)

हेही वाचा :

  1. Konkan Railway : कोकण रेल्वे भारतात येत नाही का? असे का म्हणतात प्रवासी? जाणून घ्या...
  2. Sudhir More Dead Body Found In Mumbai : उद्धव ठाकरेंच्या शिलेदाराचा रेल्वे रुळावर आढळला मृतदेह; सुधीर मोरे यांची रेल्वेपुढं आत्महत्या?
  3. Loco Pilot Suicide : रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून लोको पायलटची आत्महत्या
Last Updated : Sep 10, 2023, 9:17 AM IST

ABOUT THE AUTHOR

...view details