महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Local Mega Block : दिवाळीच्या खरेदीकरिता घराबाहेर पडणाऱ्या  मुंबईकरांचे हाल, 'या' मार्गांवर आहे मेगाब्लॉक - Mumbai Harbour local train Megablock Today

Mumbai Local Mega Block : हार्बर मार्गावर आज (5 नोव्हेंबर) दिवसकालीन ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळं लोकल अवेळी धावतील आणि इच्छित स्थानकात उशिराने पोहचतील. दरम्यान, या ब्लॉकमुळं आज लोकलनं प्रवास करणाऱ्यांचे हाल होत आहेत.

Mumbai  Harbour local train Megablock Today
हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक; लोकल प्रवास करणाऱ्यांचे हाल होण्याची शक्यता

By ETV Bharat Marathi Team

Published : Nov 5, 2023, 11:45 AM IST

मुंबई Mumbai Local Mega Block :दर आठवड्याला सुट्टीच्या दिवशी म्हणजेच रविवारी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक आयोजित केला जातो. या रविवारी देखील मध्य रेल्वे वरील रेल्वे मार्गाची दुरुस्ती सिग्नल यंत्रणेमधील यांत्रिकी दुरुस्ती तर ओव्हर हेड वायरच्या इलेक्ट्रिक देखभाल दुरुस्तीसाठी आणि अभियांत्रिकी कामासाठी मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात आलेला आहे. कामांसाठी शनिवारी (4 नोव्हेंबर) मध्य रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात आला. त्यानंतर आज (5 नोव्हेंबर) हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक असल्यानं प्रवाशांचे हाल होत आहेत.


हार्बर मार्गावरील मेगाब्लॉक : हार्बर मार्गावर कुर्ला ते वाशी अप आणि डाऊन दिशेला दोन्ही मार्गांवर मेगाब्लॉक आहे. सकाळी अकरा वाजून दहा मिनिटांनी हा मेगाब्लॉक सुरू झाला असून दुपारी सव्वाचार वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक आयोजित केलेला आहे. सकाळी 10.34 ते दुपारी 03.36 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सुटणारी वाशी/बेलापूर/पनवेल डाउन हार्बर मार्गावरील सेवा आणि सकाळी 10.16 ते दुपारी 03.47 वाजेपर्यंत पनवेल/बेलापूर/वाशीहून सुटणारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द राहतील. हार्बरच्या मेगाब्लॉकमुळं छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते पनवेल आणि बेलापूर तसंच बेलापूरपासून ते सीएसएमटी लोकल सेवा त्या काळामध्ये रद्द करण्यात आलेल्या आहे.

  • मेगाब्लॉकच्या काळात कुर्ला पर्यंत विशेष सेवा : दरम्यान, मेगाब्लॉकच्या काळात सी एसएमटीपासून ते कुर्लापर्यंत विशेष लोकलची सेवा देखील करण्यात आहे. तसंच मेगाब्लॉकच्या काळामध्ये ठाणे रेल्वे स्थानक ते वाशी रेल्वे स्थानक आणि नेरूळ स्थानक या दरम्यान लोकल सेवा उपलब्ध करण्यात आलेली आहे, अशी माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवराज मानसपुरे यांनी सांगितली.

हेही वाचा -

  1. AC Local Trains : मुंबईत एसी लोकलला भरभरून प्रतिसाद, रेल्वेला 32 कोटींचा महसूल
  2. Central Railway Mega block : मेगा ब्लॉकला पर्याय हवा नवीन तंत्रज्ञानाचा, प्रवाशांची मागणी
  3. Mumbai Central Railway : मध्य रेल्वे मार्गावर 72 तासांचा 'जम्बो मेगा ब्लॉक'

ABOUT THE AUTHOR

...view details