ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या आई, भाऊ, वहिनी आणि पुतणी यांना कोरोनाची लागण झाली आहे. अनुपम खेर यांचीही कोरोना चाचणी झाली असून अहवाल निगेटीव्ह आला आहे.
LIVE: मुंबई कोरोना अपडेट - मुंबई कोरोना अपडेट
![LIVE: मुंबई कोरोना अपडेट Mumbai Corona Update](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/768-512-7993565-535-7993565-1594533802474.jpg)
12:03 July 12
ज्येष्ठ अभिनेते अनुपम खेर यांच्या कुटुंबीयांना कोरोनाची लागण
11:44 July 12
राजभवनातील 18 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण
राजभवनातील 18 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे.
11:28 July 12
मुंबई - राजधानी मुंबईमध्ये कोरोनाचा धुमाकूळ सुरुच आहे. सामान्य नागरिकांसह अनेक प्रसिद्ध लोकांनाही कोरोनाने विळखा घातला आहे. अभिनेता अमिताभ बच्चन व अभिषेक बच्चन यांना कोरोनाची लागण झाली असून उपचारासाठी त्यांना मुंबईतील नानावटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्या कुटुंबियांची व कर्मचाऱ्यांचीही कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. बच्चन कुटुंबीयांच्या जलसा आणि प्रतीक्षा या दोन्ही बंगल्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून जलसा बंगला सील करण्यात आला आहे.