मुंबई- केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज मुंबई आणि महाराष्ट्राच्या दृष्टीने एक मोठी घोषणा केली आहे. मुंबई तसेच महाराष्ट्रातील पायाभूत सुविधा प्रकल्पाला चालना देण्यासाठी मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरची घोषणा करत अर्थमंत्र्यांनी 64 हजार कोटींपैकी या मार्गासाठी 25000 कोटींची तरतूद केली आहे. त्यामुळे हा महामार्ग आता मार्गी लागणार असून या घोषणेचे तज्ज्ञांनी स्वागत केले आहे. 1760 किमीच्या या कॉरिडॉरमुळे आजूबाजूच्या 2 किमीच्या परिसराचा सर्वांगीण विकास होईल, असे म्हणत तज्ज्ञांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे.
नितीन गडकरी यांनी केली होती घोषणा -
केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी भारतमाला परियोजनेंतर्गत गेल्या वर्षी केरळमध्ये एका कार्यक्रमात मुंबई-कन्याकुमारी कॉरिडॉरची घोषणा केली होती. हा मार्ग 1760 किमीचा असेल आणि यातील 650 किमीचा मार्ग केरळमधून जाईल. केरळमधील कासारगोड, कोची, तिरुअनंतपरम अशा शहरांना जोडणारा हा प्रकल्प असेल. तर पश्चिमी भागातील सर्व सागरी किनारपट्ट्यांना जोडत हा मार्ग जाईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले होते. तर भारतामाला परियोजनामधील हा सर्वात मोठा पायाभूत सुविधा प्रकल्प असेल, असा दावा ही त्यांनी यावेळी केला होता.
50 हजार कोटीवरून खर्च 64 हजार कोटींवर -