महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai News: वेश्या व्यवसाय सोडून निवडला वेगळा रस्ता, आता इतर महिलांसाठी शिवतात डिझायनर कपडे - वेश्या व्यवसाय सोडून टेलरिंग कामाला

मुस्कान ही वेश्या व्यवसाय करणारी महिला या कामाला कंटाळली आणि तिने आता कपडे शिवण्याचा व्यवसाय सुरू केला आहे. आज ती एक कुशल टेलर आहे. आज मुस्कान सोबत तब्बल 30 महिलांनी वेश्या व्यवसाय सोडून टेलरिंग कामाला सुरुवात केली आहे. मुंबईच्या कामाठीपुरा या वेश्या वस्तीत राहणाऱ्या एका महिलेची कहाणी सांगणार आहोत.

Mumbai News
वेश्या व्यवसाय सोडून निवडला वेगळा रस्ता

By

Published : Mar 2, 2023, 1:41 PM IST

वेश्या व्यवसाय सोडून निवडला वेगळा रस्ता

मुंबई: गरीब कुटुंबात जन्मलेल्या मुस्कान फर्जनाला एका व्यक्तीने तुला काम देतो असे सांगून मुंबईत आणले होते. एका चांगल्या व्यक्तीच्या घरात घरकाम देतो असे मुस्कानला सांगण्यात आले होते. घर काम करून आपल्याला थोडे पैसे मिळतील या आशेने मुस्कान दुसऱ्या राज्यातून मुंबईत आली. घरची परिस्थिती हालकीची असल्याने मुस्कानला शिक्षण घेता आले नव्हते. अशिक्षित मुस्कानने एका त्रयस्थ माणसाच्या बोलण्यावर विश्वास ठेवून मुंबई आली होती. मात्र, तिला माहिती नव्हते की तिझ्यासोबत पुढे काय होणार आहे. आज थोडे फार लिहिता वाचता येणाऱ्या आणि एक कुशल टेलर असलेल्या मुस्कानच्या आयुष्याच्या रस्ता हा अतिशय खडकाळ आहे.



मुस्कान 15 वर्षाची असताना: मुस्कानने सांगितले की, आमच्या घरी आम्ही चार मुले आणि आमचे आई वडील असा आमचा परिवार आहे. घरात नेहमी पैशांची कमतरता असायची. अशा परिस्थितीत घरी फक्त वडीलच कमावते असल्याने नेहमीच पैशांची चणचण असायची. मग, मी पण कमवावे असे वाटले. घरात काहीतरी माझी मदत होईल असे वाटले. तेव्हा गावातील एका माणसाने मला शहरात नोकरी मिळवून देतो असे सांगितले. मला एका मोठ्या व्यक्तीच्या घरात घर काम देतो असं सांगितले. त्याने या कामातून मला चांगले पैसे मिळतील अस सांगितले. तेव्हा माझं वय फक्त पंधरा वर्षे होते. त्या वयात मी त्याच्यासोबत येथे आले. काही दिवस टाळाटाळ केल्यानंतर त्याने माझी कामाठीपुरात विक्री केली. माझे पूर्ण आयुष्य एका अंधारात गेले.



अनेकांना विनवण्या: केवळ पंधरा वर्षाच्या एका लहान मुलीला या दलदलीत ढकलण्यात आले होते. काही दिवस तिला समजले नाही कि तिच्या सोबत काय झाले. ती त्या लोकांना कामाठीपुरातून बाहेर पडण्यासाठी विनवणी करत राहिली, पण तिच्यासाठी कोणीही पुढे आले नाही. मुस्कानसाठी सेक्स वर्कर बनणे म्हणजे मृत्यूला मिठी मारण्यासारखे होते. सुरुवातीला मुस्कानने खूप विरोध केला पण तिचे सर्व प्रयत्न व्यर्थ गेले. अगदी मुस्कानला जीवे मारण्याची, चेहरा विद्रूप करण्याची धमकी देण्यात आल्याचे तिने सांगितले. माझ्याकडे बाहेर पडण्याचा दुसरा कोणताही मार्ग नव्हता. एकतर ही जागा नवीन होती. ही जागा माझ्यासाठी तुरुंग बनली. मला तस करण्यास भाग पाडण्यात आले. माझ्याकडे अनेक ग्राहक यायचे आणि मनात नसताना मला नको ते करायला लागायचे असे मुस्कान सांगते .



फुलासारखे आयुष्य उध्वस्त: मुस्कानने सांगितले, या दलदलीत त्या अडकल्या होत्या. आता माझ्याकडे फक्त दोनच रस्ते होते. एकतर ज्या दलदलीत पडले तिथे ते काम करणे किंवा आत्महत्या करणे. आता माझ्याकडे मरण्याशिवाय किंवा हो म्हणण्याशिवाय पर्याय नव्हता. मी हार मानली आणि स्वतःला या व्यवसायात झोकून दिले. आज माझे वय 25 वर्षाहून अधिक आहे. तब्बल दहाहून अधिक वर्ष मला आता या व्यवसायात होते. जसजसे आमचे वय वाढत जाते तस तसे आमच्याकडे येणाऱ्या लोकांची संख्या कमी होत जाते. या दहा वर्षात जेव्हा जेव्हा मी गावाला गेले, तेव्हा घरच्यांनी विचारले काय काम करतेस. त्यावेळी मी त्यांना घर काम करते असे सांगितले. कारण, कमळाच्या फुलासारखी माझी इज्जत खराब झाली होती. मात्र मला माझ्या घरच्यांची इज्जत जपायची होती.


महिला बनल्या कुशल कारागीर:ज्या संस्थेने मुस्कानला या दलदलीतून बाहेर काढले त्या संस्थेचे नाव अपने आप असे आहे. अपने आप वुमेन्स कलेक्टिव्ह ही एक सामाजिक संस्था आहे. मंजू व्यास आणि पूनम अवस्थी या दोन महिला ही संस्था चालवत आहेत. ही संस्था वेश्या व्यवसायात अडकलेल्या महिलांची सुटका आणि पुनर्वसन करण्यासाठी मदत करते. एनजीओच्या संचालिका पूनम अवस्थी यांनी सांगितले की, मुस्कान फरजानाने माझ्याशी संपर्क साधला. तिने मला सांगितले तिला फसवून या व्यवसायात ढकलण्यात आले आहे. सध्या दुसऱ्या रोजगाराच्या शोधात आहे. आमच्या संस्थेने तिला सेक्स वर्कर्सच्या दलदलीतून बाहेर काढले. तिला शिलाई मशिनसारखा रोजगार दिला. मुस्कान सारख्या तब्बल 30 महिलांना आमच्या संस्थेने शिवण कलेचे प्रशिक्षण दिले. त्या उत्तम कारागीर बनल्या आहेत. सध्या या महिला याच कामाठीपुरात राहणाऱ्या इतर महिलांसाठी अतिशय स्वस्त किंमतीत कपडे शिवून देतात.

हेही वाचा:Mumbai Crime News नूडल्सचे आमिष दाखवून केले तीन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण 42 वर्षीय शेजाऱ्याला अटक

ABOUT THE AUTHOR

...view details