मुंबई Mumbai IIT Students protest: इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अर्थात आयआयटी मुंबईच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांनी ओपन हाऊस मिळावा यासाठी 24 नोव्हेंबरला मूक निदर्शनं केली आहेत. प्रशासनानं वस्तीगृहातून दुसऱ्या वसतीगृहात जाण्याच्या सूचना प्रशासनानं दिल्या होत्या. त्यामुळे आयआयटी मुंबईतील विद्यार्थी आक्रमक झाले आहेत.
ओपन हाऊस मिळावं विद्यार्थ्यांची मागणी : इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) मुंबई या ठिकाणी पीएचडीसाठी शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना प्रशासनानं वस्तीगृह स्थलांतर करण्यास सांगितलंय. एका वस्तीगृहातून दुसऱ्या वस्तीगृहात जावं अशी सूचनाही केलीय. परंतु, पीएचडीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा आता जवळ आल्यामुळं विद्यार्थ्यांना ओपन हाऊस मिळावं अशी विद्यार्थ्यांची मागणी होती. परंतु, प्रशासनानं ही मागणी पूर्ण न केल्यामुळं विद्यार्थ्यांनी त्यामुळं मूक निदर्शनं केली आहेत.
संशोधन करणाऱ्यांनी एकाच ठिकाणी निवास करण्याची सूचना : आयआयटी मुंबईच्या पीएचडीच्या विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र वस्तीगृह आहेत. वस्तीगृहात प्रत्येकाला स्वतंत्र खोल्या दिल्या होत्या. मात्र त्याऐवजी आता सर्वांनी सामायिक कक्षामध्ये निवास करण्याची सूचना आयआयटी मुंबईच्या प्रशासनाकडून देण्यात आली होती. परंतु, त्याऐवजी ओपन हाऊस मध्ये जागा देण्याची मागणी विद्यार्थ्यांनी केली होती. मात्र प्रशासनानं मागणी मान्य न केल्यानं आयआयटी मुंबईच्या विद्यार्थ्यांनी मूकनिदर्शनं केली.