मुंबई : भारताच्या आणि चीनच्या सीमेजवळ ( Indo China border ) भारताच्या हद्दीत थांबू व्हॅलीच्या पुढे गुरुडोंगर लेक आहे आणि हे सपाटीपासून सिलिगुडी पासून 17000 फूट उंचीवर आहे. या ठिकाणी जायचे कसे आणि तेही टप्प्याटप्प्याने जायचे कसे. याचे आधी प्रशिक्षण घ्याव लागते. आणि तब्बल 21 दिवस अथक मेहनत आणि परिश्रम केल्यावरच वरच्या अत्यंत टोकाला म्हणजे 17000 फूट उंचीवर भारताच्या सीमारेषेजवळ जिथे इंडियन आर्मी कॅम्प असतो तिथे जाता येते. या ठिकाणी अद्याप वीज निर्मिती केली गेलेली ( Power Generation For Indian Army ) नव्हती. आणि इतक्या जमिनीपासून हजारों फूट उंचीवर वीज तयार करणे हे अद्याप दुर्मिळ बाब म्हणता येईल पण हे साध्य केलेले आहे. आयआयटीच्या प्राध्यापक प्रकाश घोष या संशोधकाने. इतक्या उंचीवर पहिल्यांदाच वीज निर्मितीचा पहिलाच प्रयत्न जाणून घेवू सविस्तरपणे
भारतीय लष्कराला विजेची सोय नव्हती :झाले असे की समुद्रसपाटीपासून 17000 फूट उंचीवर त्या ठिकाणी इंडियन आर्मीच्या लोकांना कोणत्याही पद्धतीने वीज सुरू करण्यासाठी ग्रीड नेता येत नाही. कारण अत्यंत अवघड डोंगराळ अशी स्थिती असल्यामुळे तिथे ते अशक्य आहे. तसेच सुरक्षेचे अनेक मुद्दे देखील आहेत. त्याचबरोबर तिथे सर्व ऊर्जा ही डिझेल द्वारे निर्माण केली जाते. म्हणजे डिझेल पहिले त्यांना वाहून नेले जाते. आणि डिझेलच्या द्वारे जनरेटर सुरू करून वीज निर्माण करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र त्या ठिकाणी ऑक्सिजनची मात्राच कमी असल्यामुळे डिझेल तिथे नेल्यामुळे डिझेल ही काम करत नाही. आणि डिझेल जास्त जळते आणि डिझेलचा वास सर्वत्र तिथे नांदत असतो. डिझेल ज्या वातावरणात तिथे जाळायचे असते तिथे ऑक्सिजनचे प्रमाणच अत्यंत कमी त्यामुळे कार्बन डायऑक्साइड जास्त निघतो. त्याचा फटका आपल्या सैन्यातील सर्व सैनिकांना बसतो. अगदी खाण्यापिण्यामध्ये सुद्धा डिझेलचाच वास तिथे 24 तास असतो. माणसाला श्वासोच्छवास घेण्यासाठी पण ऑक्सिजन लागतो. इतक्या अफाट उंचीवर सैन्याने पहारा द्यायचा तिथे संघर्ष करायचा की आपल्याला श्वास घेण्यासाठी त्याने संघर्ष करायचा हे अवघड संकट सैनिकांच्या समोर नित्याचे ( Power generation near Indo China border ) आहे. त्यामुळे मोठे संकट तिथल्या इंडियन आर्मीच्या अधिकारी आणि सैन्यातील सैनिकांच्या समोर कायमचे होते. आता ह्या संशोधकाने केलेल्या कामगिरीमुळे ती समस्या कायम सुटली .
इंडियन आर्मीला वीज देण्यासाठीची अथक मेहनत : मुंबई आयटीचे संशोधक प्राध्यापक प्रकाश घोष सायन्स अँड एनर्जी या विषयावर त्यांचा अथक शोधणे अभ्यास सुरू असतो आणि त्यांनी कोरोनाच्या आधी इंडियन आर्मीला 17000 फूट उंचीवर वीज देता येऊ शकते. तीही अत्यंत स्वस्त अशी वीज आपण देऊ शकतो. त्यासाठी प्रयोग करायला हवा हे त्यांनी मनाशी ठाणले. भारतीय सैन्य दलासोबत बैठक आणि चर्चा झाल्या त्यानंतर त्यांनी या प्रकल्प सुरू केला. भारतीय सैन्यदनातले अत्यंत वरिष्ठ अधिकारी अधिकारी जनरल बिपिन कुमार रावत यांच्यासोबत देखील आयआयटीच्या प्राध्यापकांनी या संदर्भात बोलणे केले होते. याठिकाणी जायचे तर खास २१ दिवस रहाव लागत त्याशिवाय जाता येत नाही त्या जागी . विशेष प्रशिक्षण घेतल्या शिवाय इथे जाता येत नाही.