मुंबई : Old Double Decker Bus : ब्रिटीशकालीन 86 वर्षे जुन्या डबल डेकर बसचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं त्या बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. जुनी डबल डेकर बस शुक्रवारी मुंबईच्या रस्त्यांवर शेवटच्या प्रवास (Double Decker Bus Mumbai) करणार आहे. ही बस संग्रहालयात ठेवण्याचीही तयारी सुरूय. 15 सप्टेंबर रोजी या जुन्या बसला हिरवा झेंडा दाखवून तिच्या शेवटच्या प्रवासाला (AC Double Decker Bus Mumbai) सुरुवात होणार आहे. त्यानंतर ही बस मुंबईच्या रस्त्यावर दिसणार नाही. ही बस मुंबई इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट म्हणजेच बेस्टद्वारे चालवली जातेय.
बस बंद करण्याचा निर्णय :या सोबतच ओपन रुफ टॉप नॉन-एसी डबल डेकर बसेसही 15 ऑक्टोबरला बंद होणार आहेत. 1937 मध्ये डबल डेकर बसेस मुंबईमध्ये धावू लागल्या. ओपन टॉप डबल डेकर बस 26 जानेवारी 1997 रोजी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळानं सुरू केल्या होत्या. बेस्ट प्रशासनानं जनसंपर्क अधिकारी सुनील वैद्य यांनी सांगितलंय की, या बस त्यांच्या 15 वर्षांच्या सेवेनंतर बंद करण्यात आल्या आहेत. या जुन्या गाड्या आणखी काही काळ सुरू ठेवणं नियमात बसत नाही. त्यामुळं नियमानुसार या बस बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
नव्या डबलडेकर एसी बस सुरू :बेस्ट प्रशासनाचे अधिकारी सुनील वैद्य यांनी पुढे बोलताना सांगितलंय की, या बसच्या जागी एसी सुसज्ज डबलडेकर इलेक्ट्रिक बस आणण्याची योजना आहे. या जुन्या बसच्या जागेवर 900 बसची ऑर्डर देण्यात आलीय. सध्या नव्या डबलडेकर 16 एसी बस सुरू आहेत. त्यात आणखी 8 बस लवकरात लवकर ताफ्यात सामील होतील. जुन्या गाड्यांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानं गेल्या काही वर्षांत मुंबई रोडवेजच्या ताफ्यात डबल डेकर बसची संख्या कमी झालीय. या जुन्या एकूण 450 डबल डेकर बस होत्या. ज्या कोरोना कालावधीनंतर फक्त 7 उरल्या. त्यापैकी 4 सामान्यांसाठी धावत होत्या. तर 3 बसेस मुंबई दर्शन सेवा देत होत्या. (old double decker bus service)