महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Mumbai Hoax Call : मंत्रालयात दहशतवादी हल्ल्याची माहिती देणारा बनावट कॉल, आरोपीला आज न्यायालयात करण्यात येणार हजर

पोलिसांकडून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, मंत्रालयातील नियंत्रण कक्षाला सोमवारी रात्री १० वाजता धमकीचा फोन आला. एक-दोन दिवसात अतिरेकी हल्ला करण्याची धमकी देण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

Mumbai Hoax Cal
मंत्रालयात दहशतवादी हल्ल्याची माहिती देणारा कॉल

By

Published : Aug 8, 2023, 1:04 PM IST

मुंबई :मुंबईत बॉम्बस्फोट घडवून आणण्याच्या अफवा उठविणारे दोन फोन नुकतेच मुंबई पोलिसांना आले. तरीही मुंबई शहरात धमक्यांचे सत्र सुरुच आहे. नागरिकांची गर्दी असलेली ठिकाणे, शहरातील संवेदनशील ठिकाणे, राज्यातील मंत्री, पोलीस अधिकारी यांना दहशतवादी हल्ल्याच्या धमक्यांचे फोन येत आहेत. त्यातच मुंबई शहरातील अति संवेदनशील असलेल्या मंत्रालयात देखील नियंत्रण कक्षात असाच एक धमकीचा फोन आला आहे. याप्रकरणी कांदिवली पोलिसांनी प्रकाश खेमानी नावाच्या ६१ वर्षीय व्यक्तीला अटक केली आहे. त्याला आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

दहशतवादी हल्ला नेमका कोणत्या ठिकाणी होणार याबाबत धमकी देणाऱ्याने फोनवर सांगितले नाही. धमकीचा फोन येताच याची माहिती मुंबई पोलिसांना देण्यात आली आहे. फोन येताच मुंबई पोलीस सतर्क झाले. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवली. पोलिसांनी धमकीचा कॉल ट्रेस करण्याचे काम सुरू केले. या तांत्रिक तपासात पोलिसांनी कांदिवली येथून एका संशयिताला अटक केली आहे.


पोलिसांकडून तपास सुरू-धमकीचा फोन का करण्यात आला? यामध्ये खरेच काही तथ्य आहे का? याची पडताळणी मुंबई पोलीस करत आहेत. दोन दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांना देखील धमकीचा फोन आला होता. मुंबई लोकल ट्रेनमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याची धमकी यावेळी देण्यात आली होती. विमानतळ बॉम्बने उडविण्याची देखील धमकी त्याआधी देण्यात आली होती. मुंबईत गेल्या अनेक महिन्यांपासून धमकी देणाऱ्या हॉक्स कॉलचे सत्र सुरूच आहे.

कशामुळे केले जातात धमकीचे फोन-आपल्या मनात उफाळणाऱ्या भावनांवर नियंत्रण न करता येणे ही एक मोठी सामाजिक समस्या आहे. अशा भावनेच्या भरामध्ये आपण काय करतो हे आपल्याला समजत नाही. त्याचे समाजावर परिणाम होऊन अस्थिरतेचे वातावरण निर्माण होते, असे ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ यांनी सांगितले. त्यामुळेच अशा दुर्दैवी घटना घडत असताना आपण समाज म्हणून त्या व्यक्तीला समजून घेण्याची गरज आहे, असे मत ज्येष्ठ मानसोपचार तज्ज्ञ डॉ. राजेंद्र बर्वे यांनी ई टीव्ही भारतशी बोलताना मांडले आहे.

हेही वाचा-

  1. Mumbai Bomb Blast Threat : मुंबई विमानतळ बॉम्बने उडवून देण्याची धमकी; पाँडिचेरीतून एकास अटक
  2. Mumbai Police Threat Call: लोकलमध्ये साखळी बॉम्बस्फोट करण्याची मुंबई पोलिसांना धमकी, फोन करणाऱ्याला तत्काळ अटक
  3. Mumbai Bomb Blast Threat : मुंबईत विमानतळावर बॉम्बस्फोट होणार, पोलीस अधिकाऱ्याचा फोन?

ABOUT THE AUTHOR

...view details