महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

विनाकारण जनहित याचिका दाखल करणाऱ्याला मुंबई उच्च न्यायालयाचा दणका; दिली 'ही' शिक्षा

एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते राकेश चव्हाण यांना 1 आठवडा मुंबईचा समुद्र किनारा स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली आहे.

मुंबई उच्च न्यायालय

By

Published : Aug 28, 2019, 9:18 AM IST

मुंबई- उच्च न्यायालयामध्ये विनाकारण जनहित याचिका दाखल करून कोर्टाचा वेळ वाया घालवणाऱ्या याचिकाकर्त्याला मुंबई उच्च न्यायालयाने चांगलाच दणका दिला आहे. एका प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते राकेश चव्हाण यांना 1 आठवडा मुंबईचा समुद्र किनारा स्वच्छ करण्याची शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील गोरेगाव परिसरातील नेस्को प्रदर्शन केंद्र या ठिकाणी प्रदर्शनाच्या नावाखाली जागेचा गैरवापर होत असल्याची याचिका राकेश चव्हाण यांनी दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती प्रदीप नंदराजोग व न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्या खंडपीठासमोर झाली. यासंदर्भात बचाव पक्षाच्या वकिलांनी केलेल्या युक्तिवादात गोरेगावमधील प्रदर्शनाची जागा नेस्कोने 1970 पूर्वी खरेदी केलेली आहे. याठिकाणी कुठले बांधकाम होत असल्यास याचिकाकर्त्याकडून विनाकारण त्रास देण्यासाठी मुंबईच्या न्यायालयामध्ये याचिका दाखल केली जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

हेही वाचा - अभिनेत्री क्रांती रेडकरने लाँच केला स्वतःचा ब्रँड, दिलं मुलीचं नाव

यावर दोन्ही पक्षांचा युक्तीवाद ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने याचिका विनाकारण दाखल करणाऱ्या राकेश चव्हाण यांना मुंबईचा समुद्र किनारा साफ करण्याची एक आठवड्याची शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील सागरी किनारा स्वच्छता मोहिम राबवणारे अॅड. अफरोज शहा यांना भेटून त्यांच्यासोबत मुंबईतील सागरी किनारा तब्बल १ आठवडा साफ करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने याचिकाकर्ते राकेश चव्हाण यांना दिले आहेत.

हेही वाचा - आजची बेरोजगारी आणि गांधीवादी अर्थशास्त्राची गरज

ABOUT THE AUTHOR

...view details