मुंबई:राज्यातील शिंदे-फडणवीस शासनाला बारा आमदारांबाबत धाकधूक आहे. त्यासोबतच आमदारांच्या विकास निधी वाटपामध्ये मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिल्यामुळे अस्वस्थता आहे आणि मागील सुनावणी वेळी शासनाला उच्च न्यायालयाने 'याबाबत तपशीलासह नवीन प्रतिज्ञापत्र सादर करा' असे सांगितले होते. आज झालेल्या सुनावणीमध्ये शासनाने कोणते प्रतिज्ञापत्र आणले आहे, ते सादर करण्यात सांगितले; मात्र त्यावर शिवसेनेचे (उबाठा) आमदार रवींद्र वायकर यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला.
काय आहे पार्श्वभूमी?आमदार रवींद्र वायकर यांनी काही तपशील देखील याचिकेमध्ये सादर केला. त्यांनी म्हटले की, म्हाडाकडून मागासवर्गीय क्षेत्र आणि इतर क्षेत्र यासाठी 2022-23 या वर्षातील जो निधी वाटप केला गेलेला आहे, त्यामध्ये देखील दुजाभाव झालेला आहे. त्यात त्यांनी म्हटले की, झोपडपट्टी पुनर्वसनाकरिता 11420.44 लाख रुपये निधीवाटपाविषयी निर्णय केला गेला. त्यामध्ये 2 हजार 66 कोटी 87 लाख लाख रुपये मागासवर्गीय व्यतिरिक्त इतर झोपडपट्टी पुनर्विकासासाठी 7 हजार लाख रुपये निधी मुंबई उपनगर जिल्हाकरिता वाटप केला गेला आहे. या निधी वाटपामध्ये सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना झुकते माप दिले गेल्याचे रवींद्र वायकर यांनी आपल्या याचिकेमध्ये म्हटले आहे.