महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली सुधा भारद्वाज यांची जामीन याचिका - सुधा भारद्वाज जामीन याचिका

मुंबई उच्च न्यायालयाने कारागृह विभागाकडून आलेल्या अहवालाचा दाखला देत भारद्वाज यांच्या संदर्भातील वैद्यकीय अहवाल हा स्थिर आणि समाधानकारक असल्याचे म्हणत जामीन याचिका फेटाळली आहे.

Sudha Bhardwaj
सुधा भारद्वाज

By

Published : Aug 29, 2020, 7:48 AM IST

मुंबई- एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेल्या सुधा भारद्वाज यांच्याकडून मुंबई उच्च न्यायालयात जामिनासाठी याचिका दाखल करण्यात आली होती. त्यांची ही याचिका मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती आर. डी. धानुका व न्यायमूर्ती व्ही. जी. बिष्ट यांच्या खंडपीठाने फेटाळली आहे.

सुधा भारद्वाज यांनी प्रकृतीच्या कारणास्तव व राज्यात सध्या असलेल्या कोरोना संक्रमणाच्या मुद्द्यावर जामीन मिळावा, म्हणून न्यायालयात याचिका दाखल केली होती. विशेष न्यायालयात सुधा भारद्वाज यांनी याआधी दाखल केलेली जामीन याचिका फेटाळण्यात आली होती. सुधा भारद्वाज यांचे वकील अ‌ॅड. रागिनी अहुजा यांनी उच्च न्यायालयात म्हटले होते की सुद्धा भारद्वाज यांना मधुमेह व हायपरटेन्शनसारखे आजार आहेत. सुधा या सध्या मुंबईतील भायखळा महिला कारागृहात त्या असून या ठिकाणी कोरोना संक्रमण होण्याची दाट शक्यता असल्यामुळे त्यांच्या जीवितास धोका आहे.

सुधा भारद्वाज यांच्या जामीन याचिकेला एनआयए वकिलांकडून विरोध करण्यात आला. याआधी या प्रकरणातील आणखी करण्यात आलेले वरवरा राव यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना नानावटी या खासगी रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आल्याचे न्यायालयाने सांगितले. मुंबई उच्च न्यायालयाने कारागृह विभागाकडून आलेल्या अहवालाचा दाखला देत भारद्वाज यांच्या संदर्भातील वैद्यकीय अहवाल हा स्थिर आणि समाधानकारक असल्याचे म्हणत जामीन याचिका फेटाळली आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details