महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखांची उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली - शहरी नक्षलवाद प्रकरण

मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणीत पुढील तीन आठवडे नवलखा यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले असून, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे.

गौतम नवलखा

By

Published : Sep 13, 2019, 7:59 PM IST

मुंबई -शहरी नक्षलवाद प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आलेल्या गौतम नवलखा यांच्यावरील गुन्हा रद्द करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयाने निकाल देत गौतम नवलखा यांची याचिका फेटाळून लावली आहे. पुढील तीन आठवडे नवलखा यांना अटकेपासून संरक्षण देण्यात आले असून, सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत दिली आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती रणजित मोरे यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी झाली होती.

गौतम नवलखा यांच्या बाजूचा युक्तीवाद -

याआधी झालेल्या सुनावणीत नवलखा यांचे वकील युग चौधरी यांनी युक्तिवाद करताना म्हटले की, माओवाद्यांनी गौतम नवलखांना पत्र पाठवणे म्हणजे गुन्हा ठरत नाही, नवलखा यांनी माओवादी, भारत, पाकिस्तान व समाजातील इतर प्रश्नावर अनेक पुस्तक लिहिले आहेत. गौतम नवलखा हे शांती प्रिय समाजसेवक आहेत, त्यांनी गणपती सारख्या मोठ्या माओवाद्याची मुलाखत घेतली होती. त्यासाठी ते दोन आठवडे जंगलात होते. त्यावेळी विदेशी पत्रकार सुद्धा उपस्थित होते. माओवाद्यांनी त्यांच्या काही लेखांचाही आगोदर निषेध केलेला आहे.

अशी व्यक्ती सरकार आणि माओवाद्यांकडून टार्गेट केली जाऊ शकते. गौतम नवलखा यांनी माओवाद्यांवरसुद्धा टीका केलेली आहे. 'पीपल्स लिब्रेशन गोरिला आर्मी' सारख्या नक्षली गटाकडून झालेल्या नरसंहारावरही टीकात्मक लेख लिहिले आहेत. बचाव पक्षाचे वकील युग चौधरी यांनी न्यायालयात 'इकॉनॉमिक पोलिटीकल विकली'मधील काश्मीर हिंसेवर नवलखा यांच्या लेखाचा दाखला दिला. ६५ वर्षीय गौतम नवलखा एक शांती प्रिय कार्यकर्ता असून गेली ३५ वर्षे चळवळीत काम करूनही आज पर्यंत एकही गुन्हा त्यांच्याविरोधात दाखल झालेला नाही, तरिही राज्याच्या एटीएसकडून कारवाई होत नाही. झारखंड, छत्तीसगढसारख्या पोलिसांकडूनही अद्याप कारवाई झालेली नाही? मग पुणे पोलीसच का कारवाई करत आहे? असा सवाल न्यायालयात युग चौधरी यांनी केला होता.

सरकारी पक्षाचा युक्तीवाद -

दरम्यान, शहरी नक्षलवाद प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आलेल्या गौतम नवलखा व त्यांच्या नक्षली सहकाऱ्यांचे संबंध हिजबुल मुजाहिद्दीनशी संबंध असल्याचे पोलिसांनी न्यायालयात म्हटले होते. पुणे पोलिसांचे वकील अरुणा पै यांनी न्यायालयात बाजू मांडताना म्हटले की, रोना विल्सन व सुरेंद्र गडलिंग यांच्याकडून मिळालेल्या लॅपटॉप चा तपास केला असता, त्यात गौतम नवलखा व इतर नक्षली गटांचे हिजबुल मुजाहुद्दीनच्या नेत्यांसोबत चर्चा सुरू होती. गौतम नावलखा हे २०११ ते २०१४ पर्यंत काश्मिरी नेते सैयद अली शहा गिलानी व शकील बक्षी यांच्याही संपर्कात असल्याचा दावा पुणे पोलिसांनी केला.

ABOUT THE AUTHOR

...view details