महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Shivsena Mla Dilip Lande : शिवसेना आमदार दिलीप लांडे यांना मुंबई उच्च न्यायालयाचा दिलासा

2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नसीम खान ( Former Congress Mla Naseem Khan ) यांचा शिवसेना उमेदवार दिलीप लांडे ( Shivsena Mla Dilip Lande ) यांनी अवघ्या 409 मतांनी पराभव केला होता. चांदिवली विधानसभा मतदार संघातून या दोघांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. त्याविरोधात निवडणुकी वेळी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयात ( Mumbai High Court ) याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

Dilip Lande Naseem Khan
दिलीप लांडे, नसीम खान

By

Published : Jan 14, 2022, 5:03 PM IST

मुंबई -शिवसेना आमदार दिलीप लांडे ( Shivsena Mla Dilip Lande ) यांना मुंबई उच्च न्यायालयाचा ( Mumbai High Court ) दिलासा मिळाला आहे. शिवसेना आमदार दिलीप लांडे यांच्या निवडीला आव्हान देणारी मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. काँग्रेसचे माजी आमदार नसीम खान ( Former Congress Mla Naseem Khan ) यांनी ही याचिका दाखल केली होती. ( Mumbai High Court on Naseem Khan Petition )

काय आहे प्रकरण?

2019च्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नसीम खान यांचा शिवसेना उमेदवार दिलीप लांडे यांनी अवघ्या 409 मतांनी पराभव केला होता. चांदिवली विधानसभा मतदार संघातून या दोघांनी एकमेकांविरोधात निवडणूक लढवली होती. त्याविरोधात निवडणुकीवेळी मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. मुंबई उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळून लावली आहे.

याचिकेत काय?

नसीम खान यांच्या याचिकेनुसार 20 ऑक्टोबर 2019 रोजी म्हणजेच मतदानाच्या आदल्या दिवशी शिवसेना कार्याध्यक्ष आणि सध्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी परिवहन मंत्री अनिल परब आणि अभिनेता मिलिंद गुणाजी यांच्यासोबत निवडणूक आयोगाने निश्चित केलेल्या कालावधीपेक्षा जास्तकाळ प्रचार केला होता. याप्रकरणी आपण लांडे यांच्याविरोधात निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल केली होती. मात्र, निवडणूक आयोगाने आपल्या तक्रारीवर काहीच कारवाई केली नाही, असा दावा नसीम खान यांनी आपल्या याचिकेतून केला होता.

हेही वाचा -Bull Bai App Case : श्‍वेता सिंग, मयंक रावलला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी

निवडणूक आयोगाने प्रचारासाठी दिलेल्या मुदतीनंतरही ठाकरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी लांडे यांच्यासाठी केलेल्या बेकायदा प्रचारामुळे आपला अवघ्या काही मतांनी पराभव झाल्याचा दावाही खान यांनी या याचिकेतून केला होता. तसेच या निवडणूक प्रचारात आपण पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्याची खोटी चित्रफितही विरोधकांनी समाजमाध्यमाद्वारे सर्वदूर केल्याचा आरोप नसीम खान यांनी याचिकेतून केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details