मुंबई - एल्गार परिषद व माओवाद्यांशी संबंध प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या गौतम नवलखा व आनंद तेलतुंबडे यांना अटकपूर्व जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला. आज (शुक्रवारी) याप्रकरणी सुनावणी झाली. न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांनी गौतम नवलखा व आनंद तेलतुंबडे यांच्याकडून दाखल याचिकेवर निर्णय देत अटकपूर्व जामीन फेटाळला आहे.
गौतम नवलखा, आनंद तेलतुंबडे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळला - एल्गार परिषद बातमी
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन्ही याचिकाकर्त्यांना सर्वोच्य न्यायालयात दाद मागण्यासाठी ४ आठवाड्यांसाठी पोलीस अटकेपासून संरक्षण न्यायालयाने दिले आहे.
उच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर दोन्ही याचिकाकर्त्यांना सर्वोच्य न्यायालयात दाद मागण्यासाठी ४ आठवाड्यांसाठी पोलीस अटकेपासून संरक्षण न्यायालयाने दिले आहे. गौतम नवलखा व आनंद तेलतुंबडे यांच्या सह इतर आरोपींच्या विरोधात १ जानेवारी २०१८ च्या कोरेगाव भीमा हिंसाचार व माओवाद्यांशी संबंध ठेवण्याच्या आरोपाखाली पुणे पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. पुणे पोलिसांच्या दाव्यानुसार ३१ जानेवारी २०१७ रोजी कोरेगाव भीमा येथे एल्गार परिषद दरम्यान भडकाऊ व चिथावणीखोर भाषण करण्यात आली होती ज्यामुळे कोरेगाव भीमा येथे जातीय हिंसाचार झाला होता.
एल्गार परिषद ही माओवाद्यांच्या वतीने आयोजित करण्यात आल्याचा आरोप पुणे पोलिसांचा आहे. गौतम नवलखा व आनंद तेलतुंबडे ह्या दोघांचा पुणे सत्र न्यायालयाकडून अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाकडून त्यांनी अटकपूर्व जामीन याचिका दाखल करून अटकेपासून संरक्षण मिळविले आहे. मात्र, आता त्यांचा जामीन अर्ज फेटाळण्यात आल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान केंद्राकडून या प्रकरणाचा तपास राष्ट्रीय यंत्रणेकडे देण्यात आला आहे.