महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Santosh Parab Attack Case : नितेश राणेंना 27 जानेवारीपर्यंत अटकेपासून संरक्षण; सर्वोच्च न्यायालयात दाखल करणार जामीन अर्ज - भाजप आमदार नितेश राणे लेटेस्ट बातमी

संतोष परबवर हल्ला केल्याप्रकरणी ( Attack on Santosh Parab ) भाजपचे आमदार नितेश राणे ( Bjp Mla Nitesh Rane ) अडचणीत आले आहेत. उच्च न्यायालयाने नितेश राणेंना दणका दिला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. ( High Court Denied Pre arrest Bail of Nitesh Rane ) असे असले तरी त्यांना पोलीस तातडीने अटक करू शकत नाहीत

nitesh rane
नितेश राणे

By

Published : Jan 17, 2022, 7:03 PM IST

मुंबई -संतोष परबवर हल्ला केल्याप्रकरणी ( Attack on Santosh Parab ) भाजपचे आमदार नितेश राणे ( Bjp Mla Nitesh Rane ) अडचणीत आले आहेत. उच्च न्यायालयाने नितेश राणेंना दणका दिला आहे. न्यायालयाने त्यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. ( High Court Denied Pre arrest Bail of Nitesh Rane ) असे असले तरी त्यांना पोलीस तातडीने अटक करू शकत नाहीत. त्यांना अटकेपासून दिलेले संरक्षण 27 जानेवारीपर्यंत वाढवले आहे. त्यांना सर्वोच्च न्यायालयात जाण्यासाठी ही मुभा देण्यात आली आहे.

27 जानेवारीपर्यंत नितेश राणेंना दिलासा -

यापूर्वी संतोष परब हल्ला प्रकरणात नितेश राणे यांचा सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली. आज उच्च न्यायालयात नितेश राणेंच्या अटकपूर्व जामिनावर सुनावणी पार पडली. यावेळी उच्च न्यायालयाने नितेश राणेंचा अटकपूर्व जामीन फेटाळून लावला. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयात निकालाला आव्हान देण्यासाठी दोन आठवड्यांची स्थगिती देण्याची नितेश राणेंच्या वकिलांची उच्च न्यायालयात मागणी केली आहे. यावर दुपारी आज न्यायमूर्ती सी. वी. भडंग यांच्या समोर सुनावणी पार पडली. यावेळी 27 जानेवारीपर्यंत सिंधुदुर्ग पोलिसांनी कुठलीही कठोर कारवाई करणार नाही, असे आश्वसान उच्च न्यायालयाला दिले. याची नोंद घेत नितेश राणे यांना अटकेपासून उच्च न्यायालयाने जो दिलासा दिला होता तो 27 जानेवारीपर्यंत कायम ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे नितेश राणेंना यांना अटकेपासून तूर्तास दिलासा मिळाला आहे.

हेही वाचा -MLA Nitesh Rane : अज्ञातवासात असलेले आमदार नितेश राणे सिंधुदुर्गात दाखल

यादरम्यान आता नितेश राणे उच्च न्यायालयाच्या आजच्या निकालाला आव्हान देत अटकपूर्व अर्ज जामीन सर्वाच्च न्यायालयात दाखल करतील. त्यामुळे संतोष परब हल्लाप्रकरणी आता नितेश राणेंना अटकेपासून दिलासा मिळणार का? याचा निकाल सर्वोच्च न्यायालयात लागणार आहे.

काय आहे प्रकरण?

शिवसैनिक संतोष परब यांच्यावर कणकवलीमध्ये जिल्हा बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर खुनी हल्ला झाला. या हल्ल्याप्रकरणी पाच आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील सचिन सातपुते या आरोपीचे आमदार नितेश राणे यांच्यासोबत फोनवरून कॉन्टॅक्ट होता. त्यामुळे या प्रकरणात नितेश राणे यांना सह आरोपी करण्याची मागणी जिल्हा न्यायालयाकडे सरकारी वकिलांनी केली होती. तक्रारदाराने देखील आपल्या तक्रारीत आमदार नितेश राणे आणि गोट्या सावंत यांची नावे दिली होती. याप्रकरणी नवनिर्वाचित जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी आणि आमदार नितेश राणे यांचे सचिव राकेश परब यांचे देखील नाव समोर आले होते. या सर्वांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा न्यायालयात अर्ज दाखल केला होता.

ABOUT THE AUTHOR

...view details