मुंबई - महाराष्ट्रातील कारागृहात मार्च-एप्रिल २०२१ मध्ये कोरोनोच्या रूग्णांमध्ये वाढ झाली आहे. या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयाने 'सुमोटो' कारवाई करत जनहित याचिका दाखल केली आहे.
राज्यातील तुरूंगात कोरोनाचा प्रादुर्भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या आहेत किंवा कोणत्या योजना प्रस्तावित आहेत, याबाबत 20 एप्रिलपर्यंत राज्य सरकारला भूमिका मांडण्यास न्यायालयाने सांगितले आहे.
कारागृहातील कोरोना रुग्णांची परिस्थिती पाहता मुंबई उच्च न्यायालयाची राज्य सरकारला नोटीस - महाराष्ट्र तुरूंग कोरोना रूग्ण बातमी
कोरोनाबाबत सध्या राज्यात फारच गंभीर परिस्थिती असल्याने लॉकडाउनसदृश कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आता राज्यातील कारागृहांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा शिरकाव झाला आहे. कारागृहातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून सध्या सक्रीय रूग्णांची संख्या 200वर पोहोचली आहे.
तुरूंगात कोरोनाचा मोठ्या प्रमाणात प्रसार -
काही वृत्तपत्रांच्या 16 एप्रिलच्या वृत्तानुसार या याचिकेवर सुनावणी होणार आहे. सरन्यायाधीश दीपांकर दत्ता यांचे खंडपीठ या याचिकेवर 20 एप्रिलला सुनावणी करणार आहेत. महाराष्ट्रात सध्या कोरोना प्रचंड वेगाने पसरत आहे. पहिल्या लाटेपेक्षा दुसऱ्या लाटेचा वेग कितीतरी पटीने जास्त असल्याचे दिसते आहे. दररोज रूग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे राज्यात विविध उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाबाबत सध्या राज्यात फारच गंभीर परिस्थिती असल्याने लॉकडाउनसदृश कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. अशा परिस्थितीत आता राज्यातील कारागृहांमध्ये कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा शिरकाव झाला आहे. कारागृहातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत असून सध्या सक्रीय रूग्णांची संख्या 200वर पोहोचली आहे. 13 मार्च 2021 ला राज्यातील कारागृहांमध्ये केवळ 42 कोरोना रूग्ण होते. दुसर्या लाटेदरम्यान हे संक्रमण झपाट्याने पसरल्यामुळे या आकड्याने काही दिवसांतच भयावह द्विशतक गाठले आहे. राज्यातील 44 तुरूंगात आतापर्यंत तुरूंग प्राधिकरणाकडून 57 हजार 524 कोविड चाचण्या घेण्यात आल्या आहेत. एप्रिल 2020 पासून एकूण 3 हजार 113 कैद्यांना कोरोनाची लागण झाली आहे. तसेच सात जणांचा मृत्यू झाला आहे.