महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मुंबई उच्च न्यायालयाकडून परमबीर सिंह यांना ॲट्रॉसिटी प्रकरणात दिलासा - परमबीर सिंह यांना दिलासा

अकोला पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या भीमराव घाडगे यांनी 20 एप्रिलला परमबीर सिंह यांच्याविरोधात राज्य सरकार आणि वरिष्ठांकडे तक्रार केली होती. ॲट्रॉसिटी कायद्याच्या विविध 22 कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या विरोधात परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे.

परमबीर सिंह
परमबीर सिंह

By

Published : May 13, 2021, 3:35 PM IST

मुंबई -मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखल गुन्ह्याच्या प्रकरणात तूर्तास परमबीर सिंह यांना दिलासा मिळाला आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांना तूर्तास अटक करणार नाही, अशी ग्वाही राज्य सरकारने मुंबई उच्च न्यायालयात दिली आहे. आज (गुरुवार) मुंबई उच्च न्यायालयात परमबीर सिंह यांच्या विरुद्ध दाखल ॲट्रॉसिटी प्रकरणाची सुनावणी करण्यात आली. गुन्हा रद्द करण्यासाठी परमबीर सिंह यांनी दाखल केलेल्या याचिकेवर 20 मे रोजी सुनावणी होण्याची शक्यता आहे.

काय आहे प्रकरण ?

अकोला पोलीस नियंत्रण कक्षात कार्यरत असलेल्या भीमराव घाडगे यांनी 20 एप्रिलला परमबीर सिंह यांच्याविरोधात राज्य सरकार आणि वरिष्ठांकडे तक्रार केली होती. ॲट्रॉसिटी कायद्याच्या विविध 22 कलमांन्वये हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानंतर या विरोधात परमबीर सिंह यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करून प्रकरण ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आले आहे. परमबीर सिंह यांच्याकडे ठाणे पोलीस आयुक्ताचा पदभार असताना त्यांनी हजारो कोटींचा भ्रष्टाचार केल्याची तक्रार पोलीस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी केली आहे. संबधित तक्रार घाडगे यांनी मुख्यमंत्री, गृहमंत्री, पोलीस महासंचालक यांच्याकडे केली होती. परमबीर सिंह यांच्यासह 27 पोलीस अधिकाऱ्यांवर भीमराव घाडगे यांनी जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात दाखल केली. अकोला येथील कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये झिरो एफआयआर करुन हे प्रकरण आता ठाणे येथील बाजारपेठ पोलीस ठाण्याकडे वर्ग करण्यात आले आहे.

हेही वाचा -उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रसिद्धीसाठी 6 कोटींची तरतूद

ABOUT THE AUTHOR

...view details